जिल्हा बॅँकेच्या पिक कर्जास विलंब

By admin | Published: May 11, 2015 01:30 AM2015-05-11T01:30:25+5:302015-05-11T01:30:25+5:30

खर्डी व कसारा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी सेवा संस्थेच्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी केली आहे.

District Bank's Pick-up Loan Delay | जिल्हा बॅँकेच्या पिक कर्जास विलंब

जिल्हा बॅँकेच्या पिक कर्जास विलंब

Next

मनीष दोंद, खर्डी
खर्डी व कसारा परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी सेवा संस्थेच्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना या वर्षाकरिता जिल्हा बँकेने नवीन अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे वाटप सुरू न केल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. बॅँकेच्या या असहकार धोरणामुळे या भागात खासगी सावकारांची मात्र चांगलीच चलती आहे.
बँकेने या वर्षी नवीन सातबारा उतारे घेतल्याशिवाय कर्जवाटप करू नये, असे परिपत्रक आपल्या सर्व शाखांना दिल्याने अद्याप पीक कर्जाचे वाटप होऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. सातबारा आॅनलाइन झाल्यामुळे संपूर्ण दप्तर अपडेट झाले नसल्याने नवीन उतारा मिळण्यास विलंब होत आहे. तलाठी कार्यालयातून नवीन उतारे मिळविण्यास चकरा माराव्या लागत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
बँकेच्या या लालफितीविरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सेवा सोसायट्यांनीसुद्धा बँकेला मागील उताऱ्यांच्या आधारावर शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे, अशी विनंती केली असून ती बँकेने फेटाळल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेत कर्ज उपलब्ध होत नसल्याने विभागातील बरेच शेतकरी खाजगी सावकारांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेली असताना बँक अधिकाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विसर पडलेला आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांकडे लक्ष न देता विभागातील २००-२५० शेतकरी रोज कर्जासाठी येरझाऱ्या घालत आहेत.

तलाठी कार्यालयातून आॅनलाइन सातबारा उतारे शेतकऱ्यांना मिळालेच नसल्याने व जुन्या उताऱ्यांवर बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याने दोन्ही बाजूने शेतकरी अडचणीत आले आहेत.
- सुरेश सापळे, रा. चांदे, स्थानिक शेतकरी

Web Title: District Bank's Pick-up Loan Delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.