मुरबाडला जिल्हा बालसंरक्षण कक्षाने रोखला बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:45+5:302021-03-14T04:35:45+5:30

ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील संगम ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ब्राम्हणवाडी येथे १७ वर्षीय बालिकेचा विवाह शनिवारी करण्यात येत होता. याची ...

District Child Protection Cell prevents child marriage in Murbad | मुरबाडला जिल्हा बालसंरक्षण कक्षाने रोखला बालविवाह

मुरबाडला जिल्हा बालसंरक्षण कक्षाने रोखला बालविवाह

Next

ठाणे : जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील संगम ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ब्राम्हणवाडी येथे १७ वर्षीय बालिकेचा विवाह शनिवारी करण्यात येत होता. याची खबर मिळताच जिल्हा बालसंरक्षण कक्षाने हे कार्यक्रमस्थळ गाठून हा लग्नसमारंभ रोखला.

मुरबाड पोलिसांच्या सहकार्याने जिल्हा बालसंरक्षण कक्षाने ग्राम बालसंरक्षण समिती, अंगणवाडीसेविका व चाइल्ड लाइन यांच्या मदतीने हा बालविवाह थांबवण्यात आला. मुलीच्या कुटुंबाकडून या मुलीचे वय वर्षे १८ पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्यासाठी बंधपत्र लिहून घेतले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महिंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांच्या समन्वयासह संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, रोहिणी शिरसाठ यांच्या सतर्कतेने बालविवाह रोखण्यात आला.

Web Title: District Child Protection Cell prevents child marriage in Murbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.