रस्त्यांवरील खाद्यपदार्थ सुरक्षित राहण्यासाठी जिल्ह्यातक्लिन स्ट्रिट फूड हब उपक्रम!

By सुरेश लोखंडे | Published: June 26, 2023 08:26 PM2023-06-26T20:26:06+5:302023-06-26T20:26:19+5:30

गाड्यांवरील खाद्यपदार्थ स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिले आहे.

District Clean Street Food Hub initiative to keep street food safe! | रस्त्यांवरील खाद्यपदार्थ सुरक्षित राहण्यासाठी जिल्ह्यातक्लिन स्ट्रिट फूड हब उपक्रम!

रस्त्यांवरील खाद्यपदार्थ सुरक्षित राहण्यासाठी जिल्ह्यातक्लिन स्ट्रिट फूड हब उपक्रम!

googlenewsNext

ठाणे : पावसाळ्यात खाद्य पदार्थ सुरक्षित रहावे, यासाठी दक्षता घ्यावी. यासाठी क्लिन स्ट्रिट फूड हब उपक्रम सर्व महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात यावा. गाड्यांवरील खाद्यपदार्थ स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी संबंधित िवभागान िदले आहे.

लाेकमतने ‘काेराेनानंतर हातगाड्यांवरील खाद्यपदार्थानाच ठाण्यात पसंती’ या मथळ्याखाली २३जूनराेजी वृत्तप्रसिध्द करून प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. त्याची दखल घेऊन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला या रस्त्यांवरील खाद्यपदार्थ सुरक्षितेसाठी आज निदेर्श जारी केले आहे. यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत सुरक्षित, पौष्टिक व आरोग्यदायी अन्न पदार्थासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त व्यं.व. वेदपाठक, सहाय्यक आयुक्त दि. वा. भोगावडे, व्हि.एच. चव्हाण, गौ.वि. जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. राम मुंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पोवार, ग्राहक प्रतिनिधी गजानन पाटील, व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी विजय ताम्हाणे, आहारतज्ज्ञ प्रिया गुरव आदी उपस्थित होते.

यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक वर्ष आहे. मुलांना पौष्टिक खाद्य पदार्थ डब्ब्यात देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. यासाठी ईट राईट स्कूल या उपक्रमात जास्तीत जास्त शाळांनी सहभाग नोंदवावा. पावसाळ्यात रस्त्यांवरील गाड्यांवर स्वच्छ व सुरक्षित खाद्य पदार्थ मिळावेत, यासाठी खाऊ गल्ल्या आरोग्यदायी व स्वच्छ ठेवावेत. यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी. ईट राईट अंतर्गत कंपन्या, शासकीय कार्यालयातील उपहारगृहांचे स्वच्छता व दर्जासंबंधीचे प्रमाणीकरण करुन घेण्यात यावे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये खाद्य सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भात प्रशिक्षण द्यावे आदी निर्देश जायभाये यांनी अधिकार्यांना आज जारी केले आहे.

 

Web Title: District Clean Street Food Hub initiative to keep street food safe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे