अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षानी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा; तर भाजपामधून निवृत्त अधिकारी चर्चेत 

By धीरज परब | Published: October 20, 2024 09:47 AM2024-10-20T09:47:06+5:302024-10-20T09:48:04+5:30

समर्थक आणि अन्य राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत . 

district president of ncp ajit pawar group resigned and announced to contest as an independent | अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षानी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा; तर भाजपामधून निवृत्त अधिकारी चर्चेत 

अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षानी राजीनामा देऊन अपक्ष लढण्याची घोषणा; तर भाजपामधून निवृत्त अधिकारी चर्चेत 

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी पदाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीत बिघडी झाली आहे. तर भाजपात तिघां मध्ये काट्याची रस्सीखेच असताना अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शासनाचे निवृत्त अधिकारी दिलीप घेवारे यांच्या नावाची चर्चा भाजपाचे इच्छुक उमेदवार म्हणून सुरु झाल्याने इच्छुकांसह त्यांचे समर्थक आणि अन्य राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत . 

मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपा मधून निवडणूक लढवण्यास आमदार गीता जैन , माजी आमदार नरेंद्र मेहता व ऍड . रवी व्यास यांच्यात रस्सीखेच आहे . भाजपात तर इच्छूका व त्यांच्या समर्थकांनि अगदी व्यक्तिगत आणि गलिच्छ स्तरावर टीका - आरोप चालवले आहेत .  दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने ह्या मतदारसंघावर दावा करत शिवसेनेचे विक्रम प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्याचा ठराव करून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठवला आहे . 

भाजपा व शिंदेसेनेत खेचाखेची सुरु असताना आणि भाजपातील गढूळ वातावरण पाहता शासनाच्या नगरविकास विभागातील निवृत्त अधिकारी दिलीप घेवारे यांना भाजपातून उमेदवारी देण्या बाबतची चर्चा सुरु झाली आहे . घेवारे हे मीरा भाईंदर शहरात अनेक वर्ष महापालिकेच्या नगररचना विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते . सध्या ते विशेष कार्य अधिकारी म्हणून महापालिकेत मानधनावर आहेत . 

एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या भाजपातील स्थानिक इच्छुकां पेक्षा घेवारे यांना संधी दिली तरी चालेल अशी भूमिका भाजपातील काही कार्यकर्त्यां पासून जैन समाजातील जाणकार व अनेकांनी व्यक्त केली आहे . घेवारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह बहुतांश बडे नेते आदींच्या संपर्कातील मानले जातात . जैन समाज संस्थेतून ते कार्यरत आहेत . 

दुसरीकडे महायुती मध्ये बिघाडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले असून तशी तयारी सुरू केली आहे.  माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक असलेले कदम हे शहराच्या राजकारणातील जुने नेते आहेत . कदम यांच्या अपक्ष उभे राहण्याने महायुतीला फटका बसणार अशी दाट शक्यता आहे. 

भाजपाचे माजी पदाधिकारी हंसुकुमार पांडे देखील महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत . त्यांनी प्रदेश काँग्रेस नेतृत्वा कडे देखील तशी मागणी केली आहे . पांडे हे पूर्वी काँग्रेस मध्ये होते . परंतु काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन महाविकास आघाडीतून प्रबळ दावेदार असल्याने पांडे यांना संधी मिळणे अवघड आहे. पांडे यांनी देखील वेळ पडल्यास अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी चालवली आहे . 

Web Title: district president of ncp ajit pawar group resigned and announced to contest as an independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.