जिल्ह्यात पाणीटंचाई वाढणार?

By admin | Published: December 9, 2015 12:46 AM2015-12-09T00:46:15+5:302015-12-09T00:46:15+5:30

कल्याण-डोंंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरसह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणात २२० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

District will increase water shortage? | जिल्ह्यात पाणीटंचाई वाढणार?

जिल्ह्यात पाणीटंचाई वाढणार?

Next

मुरलीधर भवार,  कल्याण
कल्याण-डोंंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरसह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणात २२० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. सध्या ३० टक्के कपात लागू केल्याने जून अखेरपर्यंत हे पाणी कसेबसे पुरेल, असा दावा लघू पाटबंधारे खात्याने केला असला, तरी मार्च ते जून या काळात पाणीटंचाई तीव्र होत जाईल, अशी चिन्हे आहेत.
उन्हाळ््यातील भीषण पाणीटंचाईच्या काळातील व्यवस्थेबाबत स्थानिक स्वराज्य संस्थाकडे अद्याप कोणतेही नियोजन नसल्याची वस्तुस्थिती अधिकाऱ्याशी केलेल्या चर्चेनंतर समोर आली. पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या घोषणा खुद्द मुख्यमंत्री सतत करत असले तरी त्यादृष्टीने कोणत्याही पथदर्शी प्रकल्पाची आखणी एकाही पालिकेने केलेली नाही.
बारवी धरण औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचे आहे; तर भिवपुरी येथील आंध्र धरण टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. या दोन्ही धरणातून उल्हास नदीत दररोज जवळपास एक हजार दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. उल्हास नदीतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम पाणीपुरवठा योजना आणि कल्याण-डोंबिवली महापालिका पाणी उचलते. सध्या बारवी धरणात १३९.८६ घन दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे; तर आंध्र धरणात ११४.५९ घन दक्षलक्ष लिटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे या दोन्ही धरणाचे पाणी २२० दिवस पुरेल.
आंध्रातील पाण्यापासून टाटा पॉवर कंपनी वीजनिर्मिती करते. त्यामुळे येथून दररोज चारशे ते पाचशे दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीत सोडले जाते. जोवर नदीच्या पाण्याचा प्रवास सुरळीत आणि पुरेसा असतो. तसेच पाण्याची पातळी खालावलेली नसते, तोवर बारवीतून पाणी सोडत नाहीत. या वर्षी १५ आॅक्टोबरपासूनच पाणी सोडावे लागले.
> एमआयडीसीने उपलब्ध पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ३० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला. हा पुरवठा बुधवार ९ डिसेंबरला रात्री १२ ते शुक्र वारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, मुंब्रा, दिवा, बाळकुम पाडा क्र .१, कोलशेत या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामधून रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, बॉम्बे कॉलनी हा भाग वगळण्यात आला आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
> कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत १५० कोटी रुपयांची पाणीयोजना सुरू केली. यापूर्वी पाण्यासाठी महापालिका औद्योगिक विकास महामंडळावर पूर्णपणे अवलंबून होती.
महापालिका महामंडळाकडून जास्त दराने पाणी घेऊन नागरिकांना कमी दर आकारत होती. स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित झाल्यावर जलशुद्धीकरण पालिका करणार असल्याने खर्च वाचेल आणि नागरिकांना स्वस्त दरात पाणी मिळेल, असे सांगितले जात होते.
योजना सुरू झाल्यावरही पाण्याचा दर हजार लिटरचा दर कायमच राहिला. तो कमी झाला नाही. मात्र गेल्या तीन वर्षात पाण्याचे दर वाढविले नसल्याने वेगळ््या शब्दांत पाणी स्वस्त असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
>

Web Title: District will increase water shortage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.