अंबरनाथ-बदलापूरला दुषित पाणी पुरवठा

By admin | Published: July 29, 2015 12:06 AM2015-07-29T00:06:02+5:302015-07-29T00:06:02+5:30

आठवड्याभरापासुन जोरदार पाऊस होत असल्याने उल्हासनदीपात्रात माती मिश्रीत पाण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच पाणी उचलुन त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करुन अंबरनाथ

Disturbed water supply to Ambernath-Badlapur | अंबरनाथ-बदलापूरला दुषित पाणी पुरवठा

अंबरनाथ-बदलापूरला दुषित पाणी पुरवठा

Next

बदलापूर : आठवड्याभरापासुन जोरदार पाऊस होत असल्याने उल्हासनदीपात्रात माती मिश्रीत पाण्याचे प्रमाण वाढले आहे. हेच पाणी उचलुन त्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करुन अंबरनाथ आणि बदलापूर शहर शहराला पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कालबाह्य झाल्याने गेल्या आठवड्याभरापासुन दोन्ही शहरात दुषित पाणी परवठ्याचे प्रमाण वाढले आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहराला उल्हासनदीवरील बॅरेज धरणातून पाणीपुरवठा केले जाते. या धरणातून पाणी उचलून त्यावर बॅरेज येथील जलशुध्दीकरण केंद्रातच प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा केले जाते. मात्र धरणातून उचलण्यात येणा-या पाण्यात मातीचे प्रमाण जास्त असल्याने या जलशुध्दीकरण केंद्रात या पाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे दोन्ही शहरांना दूषित आणि माती मिश्रीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. उल्हासनदीपात्रात बदलापूरातील केमिकल कंपनीचे रसायन मिश्रीत पाणी देखील सोडण्यात येत असल्याने या पाण्यावर योग्य प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र सध्या होत असलेल्या पाणी पुरवठ्यावरुन शुध्दीकरण प्रक्रियेत त्रुटी असल्याचे दिसत आहे. त्यातही जलशुध्दीकरण पंपिंगची यंत्रणाही कालबाह्य झाल्याने ते बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका शहरातील पाणी पुरवठ्याला बसतो आहे.

नविन जलशुध्दीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात:
अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी बॅरेज धरण क्षेत्रातच नविन २२ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.मात्र या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पंिपंगची सर्व यंत्रणा उभारण्याचे काम शिल्लक असल्याने हे केंद्र सुरु होण्यास आणखी ३ महिने लागणार आहे. त्यामुळे अंबरनाथकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी विलंब होत आहे. पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा कालबाह्य झाल्यानेच आणि या यंत्रणेची क्षमता कमी असल्याने अंबरनाथ शहराला कमी पाणी पुरवठा होत आहे. नविन जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यास शहराला २ दशलक्ष लिटर्स एवढा जास्त पाणी पुरवठा करण्यास मदत होणार आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीकडून जादा पाण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात निर्णय झाल्यास अंबरनाथ पश्चिम विभागासाठी २ दशलक्ष लिटर्स वाढीव पाणी पुरवठा मिळणार आहे. एमआयडीसीकडून हे पाणी मिळाल्यास पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी करण्यास मदत होणार आहे.

Web Title: Disturbed water supply to Ambernath-Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.