दिवा भाजप आणि स्थानिक लोकांचे डम्पिंग बंद आंदोलन; दहा दिवसात डम्पिंग बंद केले नाही तर उग्र आंदोलन करणार

By अजित मांडके | Published: December 19, 2022 02:40 PM2022-12-19T14:40:43+5:302022-12-19T14:52:34+5:30

या दिवा डम्पिंगला जाणाऱ्या सर्व गाड्या अडवण्यात आल्या...

Diva BJP and local people's anti-dumping movement | दिवा भाजप आणि स्थानिक लोकांचे डम्पिंग बंद आंदोलन; दहा दिवसात डम्पिंग बंद केले नाही तर उग्र आंदोलन करणार

दिवा भाजप आणि स्थानिक लोकांचे डम्पिंग बंद आंदोलन; दहा दिवसात डम्पिंग बंद केले नाही तर उग्र आंदोलन करणार

Next

ठाणे : निवडणुका जवळ आल्या, की दिव्याला दिवा डंपिंग बंद करण्याचा खोटे आश्वासन वारंवार देण्यात येते. या संदर्भात दिवा भाजपने ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना लेखी निवेदन दिले होते. यात, येत्या दहा दिवसांत दिवा डंपिंग बंद करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. ठाणे शहर आमदार संजय केळकर व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी गटनेते मनोहर डुंबरे मिलिंद पाटणकर नारायण पवार व दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वात आज दिव्यातील जनता व भाजप यांनी डम्पिंग बंद आंदोलन केले. यावेळी दिव्यातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.


या दिवा डम्पिंगला जाणाऱ्या सर्व गाड्या अडवण्यात आल्या. यावेळी पोलीस प्रशासन व दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांच्या मध्यस्थीने सांगण्यात आले, की या संदर्भात तातडीने टेंडर काढण्यात आलेले आहे आणि दिवा डम्पिंग लवकरात लवकर आम्ही बंद करू. यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि थोड्या वेळाने सुटका केली. यावेळी, येत्या दहा दिवसात जर तुम्ही डम्पिंग बंद केले नाहीत, तर पुन्हा दिव्यातील जनता उग्र आंदोलनात रस्त्यावरती उतरेल याची दखल महापालिकेने घ्यावी, असा इशारा भाजपने पालिका प्रशासनाला देला आहे. यावेळी ठाणे शहर कार्यकारणी सदस्यही उपस्थित होते. 
 

Web Title: Diva BJP and local people's anti-dumping movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.