दिवा, मुंब्य्रामध्ये ३३६ वीजजोडण्या तोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:27 AM2019-07-27T00:27:16+5:302019-07-27T00:27:52+5:30

दोन बिल्डरांवर गुन्हा दाखल : महावितरणची भरपावसात वीजचोरीविरोधात धडक कारवाई

Diva breaks down 4 connections in Mumbai | दिवा, मुंब्य्रामध्ये ३३६ वीजजोडण्या तोडल्या

दिवा, मुंब्य्रामध्ये ३३६ वीजजोडण्या तोडल्या

Next

ठाणे : महावितरणच्या वतीने दिवा परिसरातील मुंब्रादेवी कॉलनीत शुक्रवारी बेकायदा वीज वापरणाऱ्यांवर धडक कारवाई केली. यामध्ये दिवा-मुंब्रादेवी परिसरातील विविध नऊ इमारतींमधील ३३६ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तर, कारवाई केलेल्या इमारतीच्या भरत पाटील व राकेश पाटील या बिल्डरांवर मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर, शुक्रवारी केलेल्या कारवाईतील इमारतींच्या बिल्डरांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे.

महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम-पाटील यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. दिवा परिसरात वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला असता विविध इमारतींत बेकायदा वीजजोडणी घेतल्याचे लक्षात आले. यामुळे ट्रान्सफॉर्मरवर विजेचा भार वाढल्याने प्रामाणिक ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यानुसार, गुरुवारी एका इमारतीवर, तर शुक्र वारी आठ इमारतींवर कारवाई करत या इमारतींमधील ३३६ फ्लॅट/गाळ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये मनस्विनी इमारतीत ३०, जगन्नाथधाम ६३, क्रि श प्लाझा ३२, शंकर निवास ५७, मोरेश्वर गॅलक्सी इमारतीत ३१, यशरु द्र १९, अर्जुन रेसिडेन्सी इमारतीत ७० व साई सावली इमारतीत दोन बेकायदा जोडण्या आढळून आल्या. तर, गुरु वारी कारवाई केलेल्या जगन्नाथधाम ‘ईएफ’ इमारतीतील ३२ फ्लॅट/गाळेधारकांचा पुरवठा खंडित करून बिल्डरवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही ग्राहकांनी नवीन जोडणीकरिता फक्त अर्ज केला असून त्यांच्या वीजजोडणीबाबत कारवाई करण्यात येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. या बेकायदा जोडण्यांमुळे महावितरणचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे सांगितले आहे. या कारवाईत भांडुप परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता पांडुरंग हुंडेकरी, अनिल पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. या कारवाईमुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

आठ पथकांमार्फत पोलीस बंदोबस्तात केली कारवाई
वीजचोरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी वीजजोडणीधारक/ बिल्डर यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल. तसेच बेकायदा वीजवापराची रक्कम वसूल करण्यात येईल. तसेच शासनाच्या इतर संबंधित विभागांना याबाबतची माहिती देऊन त्यांना त्यांच्या कायद्याच्या तरतुदीअंतर्गत तपासणी करण्यासाठी कळवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सहव्यवस्थापकीय संचालक काळम-पाटील यांनी दिला आहे. बेकायदा जोडण्या असलेल्या इमारतींची संख्या मोठी असल्याने आठ पथके तयार करण्यात आली होती. प्रत्येक पथकात एक वरिष्ठ अधिकारी व पुरेसे कर्मचारी नेमण्यात आले होते. या कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

Web Title: Diva breaks down 4 connections in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.