ठाणे जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसारख्या राष्ट्रीय प्रकल्पाची विभागीय आयुक्तांकडून झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 10:27 PM2022-04-26T22:27:00+5:302022-04-26T22:30:01+5:30

हाती घेतलेले राष्ट्रीय प्रकल्प देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.

Divisional Commissioner clears trees of national projects like bullet train in Thane district! | ठाणे जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसारख्या राष्ट्रीय प्रकल्पाची विभागीय आयुक्तांकडून झाडाझडती!

ठाणे जिल्ह्यातील बुलेट ट्रेनसारख्या राष्ट्रीय प्रकल्पाची विभागीय आयुक्तांकडून झाडाझडती!

Next

ठाणे : जिल्ह्यात सध्या मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे (बुलेट ट्रेन), कल्याण कसारा तिसरी रेल्वे मार्ग आणि समर्पित मालवाहतूक मार्गिका (डीएफसीसीआयएल) आदी महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पांची सद्य:स्थिती, भूसंपादनात येणाºया अडचणी, निधीचे वाटप, प्रकल्पासाठीच्या जमिनीचा ताबा घेणे, प्रलंबीत असलेले प्रकल्प आदीं राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामांची झाडाझडती कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी मंगळवारी घेतली.

जिल्ह्यात हाती घेतलेले राष्ट्रीय प्रकल्प देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांशी संबंधित भूसंपादन व इतर कार्यवाहीसाठी प्राधान्यक्र म ठरवून त्या कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी या आढावा बैकीत पाटील यांनी संबंधीत अधिकाºयांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, कोकण विभागाचे उपायुक्त (पुनर्वसन) पंकज देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक बाबासाहेब रेडेकर, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, कल्याण येथील उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी जयराम कारभारी, उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, राष्ट्रीय हायस्पिड रेल्वे प्रकल्पाचे एस.के. पाटील, समर्पित मालवाहतूक मार्गिका प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव त्यागी यांच्यासह विविध प्रकल्पांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

या आढावा बैठकीत पाटील यांनी अधिकाºयांकडून या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेत देशाच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प कसे महत्त्वाचे आहेत. त्याची माहिती दिली.  या प्रकल्पांच्या कामांना महसूल यंत्रणेने प्राधान्य देऊन कामे पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करावा. भूसंपादन व त्यासंबंधीची कामे २० मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करण्याचे सुतोवाचही त्यांनी अधिकाºयांना दिले आहे. यावेळी नार्वेकर यांनी प्रकल्पांच्या भूसंपादनाची सध्याची स्थिती व येणाºया अडचणीं पाटील यांना या बैठकीत लक्षात आणून दिल्या. त्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विविध प्रकल्पांच्या अधिकाºयांनी येणाºया समस्या, अडचणी या बैठकीत उघड केल्या.

Web Title: Divisional Commissioner clears trees of national projects like bullet train in Thane district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे