मेट्रोमोनियल साईटद्वारे घटस्फोटीत महिलांना अडीच कोेटींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनास अटक

By जितेंद्र कालेकर | Published: December 16, 2021 04:29 PM2021-12-16T16:29:28+5:302021-12-16T16:31:57+5:30

मेट्रोमोनानियल साईटद्वारे (विवाह विषयय संकेतस्थळ) विधवा तसेच घटस्फोटित महिलांशी जवळीक वाढवून त्यांची लग्नाच्या अमिषाने आर्थिक फसवणूक करीत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणाºया प्रजित जोगिश केजे उर्फ प्रजित उर्फ प्रजित टीके (४४, रा. ओडतिनगम माही, पाँडेचेरी) या भामटयाला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

Divorced women cheated by Metromonial site | मेट्रोमोनियल साईटद्वारे घटस्फोटीत महिलांना अडीच कोेटींचा गंडा घालणाऱ्या ठकसेनास अटक

कापूरबावडी पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कारवाईतब्बल २६ महिलांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मेट्रोमोनानियल साईटद्वारे (विवाह विषयय संकेतस्थळ) विधवा तसेच घटस्फोटित महिलांशी जवळीक वाढवून त्यांची लग्नाच्या अमिषाने आर्थिक फसवणूक करीत त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवणाºया प्रजित जोगिश केजे उर्फ प्रजित उर्फ प्रजित टीके (४४, रा. ओडतिनगम माही, पाँडेचेरी) या भामटयाला कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याने आतापर्यंत २६ महिलांची दोन कोटी ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी दिली.
ठाण्याच्या ढोकाळी येथील एका महिलेशी आॅगस्ट २०२० ते ११ डिसेंबर २०२१ या दरम्यान एका मेट्रोमोनियल साईटवरून प्रजित या भामटयाने लग्नासाठी संपर्क केला. त्याने पुढे तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक वाढविली. शारिरीक संबंधही ठेवले. आपले पॅरिस येथे हॉटेल असून त्याच्या विक्रीतून मिळालेले पैसे आरबीआयमध्ये अडकले आहेत. ते खाते चालू करण्यासाठी पैशाची नितांत गरज असल्याची बतावणी केली. शिवाय, त्याबदल्यात तिला दुप्पट पैसे देण्याचे खोटे आश्वासन देऊन तिच्याकडून १६ लाख ८६ हजार ९९९ रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी तिने कापूरबावडी पोलीस ठाण्यात अलिकडेच बलात्कारासह फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे, निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे आणि सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांच्या पथकाने याबाबतचा तपास सुरु केला. हा ठकसेन परराज्यात वास्तव्यास असून तो अधुनमधुन महाराष्ट्रात आल्यानंतर विविध लॉजेसमध्ये वास्तव्य करीत असे. विधवा, घटस्फोटीत महिलांना गोड बोलून त्यांच्याशी जवळीक साधुन, त्यांच्याकडील क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड घेऊन त्यावरून महागडया वस्तु खरेदी करुन त्याचा कोणताही पुरावा मागे सोडत नसल्याची बाब चौकशीत समोर आली. त्यामुळे त्याचा तपास लावणे हे पोलिसांना आव्हान होते. तो ठाण्यात येणार असल्याची माहिती या पथकाला कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारावर मिळाली. त्याच आधारे प्रजितला ११ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली. त्याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे.
* चौकशीत दिली कबूली-
प्रजित याने आतापर्यंत मुंबई, केरळ, बेंगलोर आणि कलकत्ता अशा विविध राज्यांतील तब्बल २६ महिलांची दोन कोटी ५८ लाखांची फसवणूक केल्याची कबूली दिली. त्याने दुप्पट पैसे देण्याचेही आश्वासन देऊन फसवणुक केल्याचेही तपासात उघड झाले. त्याने आणखी किती महिलांची अशा प्रकारे फसवणूक केली, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे उपायुक्त राठोड यांनी सांगितले.

Web Title: Divorced women cheated by Metromonial site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.