सॅल्यूट! फुटबॉलसाठी भारताचे नेतृत्व करणाऱ्या दिव्यांग कोमलचे पालकत्व जि.प. शाळेच्या शिक्षकाकडे!
By सुरेश लोखंडे | Published: July 6, 2023 05:09 PM2023-07-06T17:09:30+5:302023-07-06T17:09:46+5:30
बर्मिंग हॅम युके येथे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा १२ ते २१ आॅगस्ट दरम्यान पार पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : परदेशातील ‘बर्मिंग हॅम यूके’ येथे पार पडणाºया आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व पुणे येथील माई भवनच्या दोन दिव्यांग (अंध) विद्यार्थिंनी करीत आहेत. त्यातील कोमल गायकवाड राष्ट्रीय खेळाडूचे पालकत्व ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अंबरनाथ येथील शिक्षकाने स्विकारलेले असल्याचे निदर्शनात आले आहे.
बर्मिंग हॅम युके येथे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा १२ ते २१ आॅगस्ट दरम्यान पार पडत आहे. या स्पर्धेतील भारताच्या नेतृत्वासाठीभारतीय अंध फुटबॉल संघाने निवड केलेल्या रष्ट्रीय खेळाडूंमध्ये पुणे येथील देहू रोडच्या माईभवनमधील कोमल गायकवाड व दीपाली कांबळे या दोघींचे निवड केली आहे. यातील गायकवाड या दिव्यांग विद्यार्थिनीचे पालकत्व ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक रमेश जाधव यांनी घेतलेले असल्याचे निदर्शनात आले आहे. जन्मापासून दोन्ही डोळ्याने अंध असणारी कोमल सुभाष गायकवाड,ही नाशिक जिह्यातील रौळस ता. निफाड येथील मुळची रहिवाशी आहे. कोमलही जाधव यांच्या मामाची मुलगी आहे. तिला शिक्षणापासून वंचित न ठेवण्याचा ध्यास जाधव यांनी घेऊन तिच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतलेली आहे.
अंबरनाथ येथे राहत असताना तिच्या शिक्षणासाठी मुंबई जाऊन जाधव अंध शाळेचा शोध घेत असत. यादरम्यान बदलापुर गावातील शिक्षक मित्र मिलींद पवार यांनी जवळ बदलापूर गावातील प्रगती अंध विद्यालय सुचवले. त्यासाठी लागणारे अंधत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अंबरनाथ पंचायत समितीचे तत्कालीन आयडीई प्रमुख राणू बनसोडे यांच्या सहकार्याने तात्काळ गोवेली ता. कल्याण येथील विद्यार्थी आरोग्य शिबिरात कोमलच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त केलेले आहे.
सध्या ‘एसवायबीए’ला असलेल्या कोमलचे प्रारंभीचे शिक्षण बदलापूरच्या प्रगती अंध विद्यालयात संस्थेच्या संस्थापिका, राष्ट्रीय आदर्श शिक्षिका व आदर्श माता पुरस्कार प्राप्त सुहासिनी मांजरेकर यांच्या तालमीत झाले. या १० वी पर्यंतच्या शिक्षणानंतर पुढे महाविद्यालयीन शिक्षण बदलापूर करण्याचा प्रयत्न जाधव यांनी केला. मात्र कोमलने त्यास नकार दिला. तिची शाळेतील सिनिअर अंध मैत्रीण पुण्यातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे कळले. तिच्या शोधातून देहूरोड पुणे येथील माई बालभवन येथील निराधार मुलांच्या सामाजिक संस्थेत कोमलला पुढील शिक्षणाची संधी संस्थापिका माई इंगळे यांनी दिलेली. सखोल मार्गदर्शनानुसार कोमलने फुटबॉलमध्ये प्रविण्य मिळवत महाराष्ट्र संघात स्थान मिळवुन कॅप्टन पदाचा मानही मिळवला. आता इंग्लंड येथे होणा ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीी तिची भारतीय अंध महिला फुटबॉल संघात निवड झाली आहे.