बीएसयूपीच्या घरांचा ताबा मिळवण्यासाठी दिव्यांगांनी केले कायदेभंग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:36+5:302021-09-09T04:48:36+5:30

ठाणे : दीड वर्षापूर्वी सोडत काढून पात्र दिव्यांगांना बीएसयूपीची घरे देण्यासाठी ताबापत्र ठामपाने दिली आहेत. मात्र, या घरांचा ...

Divyangas staged agitation to get possession of BSUP houses | बीएसयूपीच्या घरांचा ताबा मिळवण्यासाठी दिव्यांगांनी केले कायदेभंग आंदोलन

बीएसयूपीच्या घरांचा ताबा मिळवण्यासाठी दिव्यांगांनी केले कायदेभंग आंदोलन

Next

ठाणे : दीड वर्षापूर्वी सोडत काढून पात्र दिव्यांगांना बीएसयूपीची घरे देण्यासाठी ताबापत्र ठामपाने दिली आहेत. मात्र, या घरांचा प्रत्यक्ष ताबा अद्यापही देण्यात आलेला नाही. घरांचा ताबा मिळावा, यासाठी दिव्यांगांनी आंदोलन करूनही कार्यवाही होत नसल्याने बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटना संचालित अखिल भारतीय दिव्यांग सेनेने बुधवारी ठामपा मुख्यालयाबाहेर कायदेभंग आंदोलन केले. दरम्यान, आयुक्तांनी भेट देऊनही निर्णय घेण्याऐवजी केवळ पोकळ आश्वासन दिल्याने हे आंदोलन केल्याचे मोहम्मद युसूफ मोहम्मद फारुख खान यांनी सांगितले. पोलिसांनी आंदोलकांना अटक करून सोडून दिले.

दिव्यांगांना बीएसयूपी योजनेतून परवडणारी घरे देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांमधून पात्र-अपात्र निश्चित करून ६ फेब्रुवारी २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दिव्यांगांना चाव्या देण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला होता. मात्र दीड वर्षानंतरही काही अपवाद वगळता बहुतांश दिव्यांगांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आलेला नाही. बीएसयूपी कक्ष स्थावर मालमत्ता विभागाकडे तर स्थावर मालमत्ता विभाग बीएसयूपी कक्षाकडे जबाबदारी ढकलत आहे. या घरांचा ताबा मिळावा, यासाठी १२ जुलै रोजी दिव्यांगांनी पालिका मुख्यालयासमोर भरपावसात धरणे आंदोलनही केले होते. त्या वेळी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दीड महिन्यात दिव्यांगांना घरांचा ताबा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांना आयुक्तांनी पुढील २० दिवसांनंतर घरांचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. त्यावर दिव्यांगांनी, याआधीही अशीच आश्वासने दिली आहेत. मात्र, त्याची पूर्तता न केल्याने ठामपाने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी केली. ही मागणी फेटाळून लावल्याने सर्व दिव्यांगांनी पोलिसांचा मनाई आदेश धुडकावून पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केले.

Web Title: Divyangas staged agitation to get possession of BSUP houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.