ठाण्यातही सीमावाद उफाळण्याची चिन्हे, दिवेकरांनी दिले आयुक्तांना पत्र

By अजित मांडके | Published: December 7, 2022 06:14 PM2022-12-07T18:14:09+5:302022-12-07T18:16:03+5:30

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी

Diwa residents gave a letter to the Commissioner signs of border extremism in Thane as well | ठाण्यातही सीमावाद उफाळण्याची चिन्हे, दिवेकरांनी दिले आयुक्तांना पत्र

ठाण्यातही सीमावाद उफाळण्याची चिन्हे, दिवेकरांनी दिले आयुक्तांना पत्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्यात एकीकडे महाराष्ट्र आणि बेळगावमध्ये सीमावाद उफाळला आहे. त्यात दुसरीकडे आता दिवा भागातील नागरीकांनी देखील मागील ४० वर्षात सुविधांपासून वंचित असल्याचे सांगत आम्हाला नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी ठाणो महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. दिव्यातील जागा हो दिवेकर या संस्थेने दिलेल्या पत्रनंतर आता ठाण्यातही दिवा सीमावाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला असतानाच, दुसरीकडे दिवा परिसर ठाणो महापालिका हद्दीतून वगळण्याची मागणी जागा हो दिवेकर या संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी ठाणो महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे एका पत्रद्वारे केली आहे. ठाणो महापालिका स्थापित होऊन जवळपास 4क् वर्षे होऊन गेली. त्यात बरीच खारजमीन, खाडीप्रदेश समाविष्ट झाला. त्यात खूप मोठा भाग म्हणजे दिवा ग्रामीण परिसर आहे. ज्यात दातीवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई , पडले, खिडकाळी, शीळ, खार्डी असा बराचसा खाडीकिनारा परिसर ठाणे महापालिकेने खूप मोठी आश्वासने देऊन समाविष्ट करून घेतला. ज्याला आधीपासूनच भूमीपुत्नांचा विरोध होता. परंतु महापालिकेने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. परंतु दुर्दैवाने आम्ही ठेवलेला विश्वास हा ठाणो महापालिकेने फोल ठरविला आहे. आज इतकी वर्षे होऊन देखील येथील रहिवाशांना मुलभुत सोई सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे या पत्रत नमुद करण्यात आले आहे.

पिण्याचे पाणी अजून आम्हाला मिळत नाही. याउलट दिव्यातील कित्येक नागरिकांना पिण्याचे पाणी ट्रेनने वाहून आणताना आपला जीव गमवावा लागला. साधे आरोग्य केंद्र, स्वच्छतागृहे नाहीत, कोणतीही कामे निघाली तर तीसुद्धा फक्त निव्वळ पैसे कमावण्याचे साधन बनले. रस्ते दुरु स्ती, गटारे कामे फक्त एक भ्रष्टाचाराचे साधन बनले. दिवा व परिसर जणू काही भ्रष्टाचाराचीच खाण बनला आहे. जाणीवपूर्व दिव्याला विकासापासून वंचित ठेवले गेले. आता आम्हा दिवावासीयांची सहनशक्ती संपली आहे. यावर आता एकच तोडगा तो म्हणजे दिवा परिसर ठाणो महापालिका क्षेत्नातून वगळून नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुरूवातीला आम्हाला नवी मुंबई महापालिकेने सामील करून घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. परंतु आम्ही नकार देऊन नंतर ठाणो महापालिकेत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. ज्याचा आता आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. तरी आम्ही आमची चूक सुधारू इच्छीत आहोत. त्यासाठी दिवा ग्रामीण व आजूबाजूच्या परिसराला नवी मुंबईत समाविष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. नवी मुंबईत देखील भरपूर परिसर दिव्याप्रमाणोच होते. परंतु अचूक नियोजन आणि पारदर्शक कारभारामुळे आज नवी मुंबईचा कायापालट आपण पाहत आहोत. म्हणूनच आम्हाला परत एकदा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे आणि आमची या सर्व नरक यातनातून सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Diwa residents gave a letter to the Commissioner signs of border extremism in Thane as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.