फेब्रुवारीत ठाण्यात होणार दिवाळी

By admin | Published: January 23, 2016 02:51 AM2016-01-23T02:51:20+5:302016-01-23T02:51:20+5:30

नाट्य संमेलनस्थळी उत्साहपूर्ण नाट्यमय वातावरण आणि उर्वरित शहर थंड, असे वातावरण संमेलनकाळात पाहायला मिळते.

Diwali to be held in February | फेब्रुवारीत ठाण्यात होणार दिवाळी

फेब्रुवारीत ठाण्यात होणार दिवाळी

Next

ठाणे: नाट्य संमेलनस्थळी उत्साहपूर्ण नाट्यमय वातावरण आणि उर्वरित शहर थंड, असे वातावरण संमेलनकाळात पाहायला मिळते. नागरिकांना संमेलनाविषयी काहीही गंधवार्ता नाही, असे चित्र दिसू नये याकरिता नाट्यसंमेलन काळात शहरातील प्रत्येक सोसायट्यांवर आकाश कंदिल लावा, अशी अभिनव सूचना ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केली आणि उपस्थितांनी टाळ््या वाजवून त्याचे स्वागत केले. त्यामुळे फेब्रुवारीत ठाण्यात दिवाळी साजरी होणार आहे.
९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाची पहिली बैठक कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झाली. यावेळी शहरातील नाट्यचळवळीतील मान्यवरांची उपस्थिती होती. बैठकीत शहरातील कलाकार व ठाणेकर रसिक यांच्या सूचना मागविण्यात आल्या. नाट्यसंमेलनाची दोन्ही कार्यालये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे अ.भा. मराठी नाट्यपरिषद ठाणे शाखेचे अध्यक्ष खा. राजन विचारे यांनी सांगितले. मासुंदा तलावात करण्यात येणाऱ्या तरंगणाऱ्या रंगमंचावर सकाळी ६ ते ८ यावेळेत तीन दिवस नाट्यसंगीताचे कार्यक्रम होणार असून, अभिनय कट्ट्याच्या तरुण कलाकरांना वाव देण्यासाठी सायंकाळी त्यांची कला सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. ठाण्यातील नाट्य-सिनेसृष्टीतील कलाकारांचा वेगवेगळ््या दिवशी यथोचित सत्कार केला जाणार आहे. १९ फेब्रुवारीला निघणारी नाट्यदिंडी स्टेडियममध्ये सहा वाजता पोहोचून सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन होईल. या नाट्यदिंडीत वारकऱ्यांसह ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांचे चित्ररथ असणार आहेत. यावेळी सर्व कलाकार, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील उपस्थित राहणार आहेत. सर्वपक्षीय मंडळींना एकत्र घेऊनच हे संमेलन करणार असून, नाट्यप्रेमींच्या येणाऱ्या सूचनांचेदेखील स्वागत केले जाणार असल्याचे विचारे यांनी सांगितले.
तरुणांचा संमेलनात सहभाग वाढविण्यासाठी १५ दिवस त्यांच्या सूचनेची स्पर्धा घेण्यात यावी. जी सूचना उत्तम असेल तिला पारितोषिक देण्यात यावे, ठाण्यात कलाकारांची डायरी अपूर्ण आहे त्यात उल्लेख न केलेल्या कलाकारांची नावे लिहिण्यात यावी, राज्यनाट्य स्पर्धेतून मोठे झालेल्या कलाकारांचे कमानीवर फोटो लावण्याच यावे, भाषणे वेळेत पार पाडावीत. उदघाटनपासून ते समारोपापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांची मिनिट्स कॉपी, नाट्यदिंडीची रुपरेषा माध्यम प्रतिनिधांनींना लेखी देण्यात यावी, स्वागताध्यक्ष, संमेलनाध्यक्ष यांच्या भाषणाची आॅडीओ क्लीप, प्रसारमाध्यमांसाठी आदर्श मीडिया सेंटर, त्याच्या शेजारी माहिती केंद्र असावे, संमेलनाच्या प्रत्येक दिवशीच्या आदल्या दिवशी आढावा बैठक घेण्यात यावी, पडद्यामागे काम करीत असलेल्या कलाकारांचा वार्तालाप आयोजित करण्यात यावा, गेल्या १५ ते २० वर्षांत झालेल्या स्वागताध्यक्षांचा सत्कार करण्यात यावा, नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षाची प्रकट मुलाखत घेण्यात यावी, अशा सूचना जयू भाटकर यांनी मांडल्या. बैठका व नाट्यसंमेलनातील कार्यक्रमांना उशीर होऊ नये, अशी सूचना डॉ. अरुंधती भालेराव यांनी मांडली. राहुल लोंढे, रामनंद सुळे, किरण नाकती, बलवंत कर्वे, अभय मराठे यांनी विविध सूचना केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Diwali to be held in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.