ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० सानुग्रह अनुदान जाहीर, कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून एक महिन्याचा पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 07:55 PM2021-10-25T19:55:06+5:302021-10-25T19:55:37+5:30
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे .
ठाणे : महापालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीचे सानुग्रह अनुदान म्हणून १५ हजार ५०० रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी ही घोषणा केली. मागील वर्षीदेखील तेवढेच सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. तर कंत्राटी कामगारांना बोनस म्हणून अतिरिक्त एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सानुग्रह अनुदानामुळे ठाणे महापालिकेवर तब्बल १२ कोटी ८३ लाख ९ हजार रुपयांचा बोजा पडणार आहे.
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे .
ठाणे पालिकेकच्या विविध विभागात स्थायी,अस्थायी, ठोक पगारावरील कर्मचारी, अनुकंपा वारसा कर्मचारी अशा ८ हजार कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय घेण्यात आला. मागीलवर्षी पालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आला होता. गेल्या वर्षी कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ न झाल्याने यंदादेखील तेवढेच अनुदान देण्यात आले आहे आहे. कर्मचाऱ्यांना २५ हजाराचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी केली होती. मात्र २५ हजार बोनस देण्याची मागणी मान्य न करता कायस्वरूपी कामगारांना १५ हजार ५०० तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्ह्णून देण्यात येणार आहे.
ठाणे महानगर पालिकेत कायस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजार ८३ एवढी आहे. अनुकंपा वारसा तत्वावरील कर्मचारी २ हजार ५८ ठामपा ठोक पगारावरील कर्मचारी २५२, शिक्षण विभागातील कर्मचारी १ हजार ५१, शिक्षण विभगातील ठोक पगारावर कर्मचारी २३ असे एकूण ८ हजार २७८ कर्मचारी कार्यरत आहेत. महापालिका कामगार कर्मचाऱ्यांना मागील तीन आर्थिक वर्षात अदा करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानात सन २०१४ -१५ मध्ये १२ हजार ५००, सन २०१५-१६ मध्ये १३ हजार २५०, सन २०१६ -१७ मध्ये १४ हजार सन २०१७-१८ मध्ये १५ हजार १०० तर सन २०१८-१९ मध्ये १५ हजार ५००, सन २०१९-२० मध्ये १५ हजार ५००, तर सन २०२०-२१ मध्ये १५ हजार ५०० सानुग्रह अनुदान देण्यात आले.