ठामपा कर्मचाऱ्यांना १५,५०० ची दिवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:21 AM2019-09-21T01:21:07+5:302019-09-21T01:21:18+5:30
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसह टीएमटीच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे.
ठाणे : ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसह टीएमटीच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ४०० रुपयांची वाढ केली असल्याचा दावा म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी केला. कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान म्हणून एक महिन्याचा अतिरिक्त पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महापालिकेवर १२ कोटी ८३ लाख नऊ हजार रु पयांचा बोजा पडणार आहे.
महापालिकेचे आठ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी कामगारांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहे. दिवाळीच्या सानुग्रह अनुदानाची रक्कम आधीच जाहीर झाल्याने कर्मचाºयांची दिवाळी गोड होणार आहे. ठाणे पालिकेच्या विविध विभागांतील आठ हजार कर्मचाºयांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानाचा निर्णय शुक्रवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि म्युनिसिपल लेबर युनियन अध्यक्ष रवी राव यांच्या बैठकीत घेण्यात आला. टीएमटी कर्मचाºयांनाही एवढेच सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. कंत्राटी कामगारांनी एका महिन्यात जेवढी हजेरी लावली आहे, तेवढा एका महिन्याचा बोनस म्हणून देण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी कर्मचाºयांची संख्या पाच हजार ८३ एवढी आहे. अनुकंपा वारसा तत्त्वावरील कर्मचारी दोन हजार ५८, ठामपा ठोक पगारावरील कर्मचारी २५२, शिक्षण विभागातील कर्मचारी एक हजार ५१, शिक्षण विभागातील ठोक पगारावर कर्मचारी २३ असे एकूण आठ हजार २७८ कर्मचारी कार्यरत आहेत.
>महापालिका कामगार कर्मचाºयांना मागील तीन आर्थिक वर्षांत अदा करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानात २०१४-१५ मध्ये १२ हजार ५००, २०१५-१६ मध्ये १३ हजार २५०, २०१६-१७ मध्ये १४ हजार, २०१७-१८ मध्ये १५ हजार १००, तर २०१८-१९ मध्ये १५ हजार ५०० रुपये मंजूर केले आहे.