मीरा भाईंदर मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा २४ हजार ७१७ रुपयांचे दिवाळी सानुग्रह अनुदान

By धीरज परब | Published: October 10, 2024 08:02 PM2024-10-10T20:02:59+5:302024-10-10T20:03:19+5:30

Mira Road News: मीरा भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे . या शिवाय मानधन वरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील ३ हजार ८८४ ते २४ हजार ७१७ रुपये ह्या दरम्यान दिवाळी बोनस मंजूर केला गेला आहे.

Diwali grant of 24 thousand 717 rupees to Mira Bhayander Municipal Officers-Employees this year | मीरा भाईंदर मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा २४ हजार ७१७ रुपयांचे दिवाळी सानुग्रह अनुदान

मीरा भाईंदर मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा २४ हजार ७१७ रुपयांचे दिवाळी सानुग्रह अनुदान

 मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे . या शिवाय मानधन वरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील ३ हजार ८८४ ते २४ हजार ७१७ रुपये ह्या दरम्यान दिवाळी बोनस मंजूर केला गेला आहे.

महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी प्रशासकीय बैठकीत घेतलेल्या निर्णया नुसार यंदा पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानावर ४ कोटी ४६ लाख ९३ हजारांचा होणार खर्च करण्यास मंजुरी दिली आहे . महापालिकेतील वर्ग १ ते ४ मधील अधिकारी व कर्मचारी असलेल्या १ हजार ४१० जणांना ; शिक्षण विभागातील १५१ शिक्षक व कर्मचारी यांना तसेच १५ सेवानिवृत्त अधिकारी यांना प्रत्येकी २४ हजार ७१७ रुपये दिवाळी मिळणार आहे . 

ठोक मानधन वरील १२८ आशा लिंक वर्कर यांना प्रत्येकी ३ हजार ८८४ रुपये ;  वैद्यकीय विभागातील क्षयरोग , कृष्ठरोग, मलेरिया निर्मूलन आदी कामे करणाऱ्या १२८ जणांना प्रत्येकी १४ हजार २१२ रुपये ; ६४ संगणक चालक व लघुलेखक यांना १९ हजार ३२ रुपये ; वैद्यकीय आरोग्य विभागातील ७० कर्मचाऱ्यांना १५ हजार ६३३ रुपये ; ठोक मानधनवरील ४६ शिक्षकांना १२ हजार ; सर्व शिक्षा अभियानातील २० कर्मचाऱ्यांना १९ हजार ३२ रुपये दिवाळी अनुदान मिळणार आहे . या शिवाय मानधनवरील अन्य कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी अनुदान मंजूर केले गेले आहे . 

कायम आणि मानधन वरील मिळून एकूण २ हजार ५१ अधिकारी व कर्मचारी यांची दिवाळी यंदा देखील चांगली जाणार आहे . अधिकारी - कर्मचाऱ्यांची दिवाळी साठी करदात्या जनतेच्या खिशातून जमलेल्या तब्बल ४ कोटी ४६ लाख ९३ हजारांचा खर्च होणार आहे . 
 

Web Title: Diwali grant of 24 thousand 717 rupees to Mira Bhayander Municipal Officers-Employees this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.