उठा उठा दिवाळी संपली; पाण्याची वेळ झाली

By admin | Published: November 14, 2015 02:16 AM2015-11-14T02:16:04+5:302015-11-14T02:16:04+5:30

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळीकरिता तात्पुरता स्थगित केली होती.

Diwali is over; Time for water came | उठा उठा दिवाळी संपली; पाण्याची वेळ झाली

उठा उठा दिवाळी संपली; पाण्याची वेळ झाली

Next

ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळीकरिता तात्पुरता स्थगित केली होती. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्यांकरिता चार दिवसांची पाण्याची दिवाळी होती. मात्र आता दिवाळी संपल्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्याच्या प्रारंभापासून पाणी कपातीचे तीव्र चटके जाणवू लागणार आहेत. परिणामी सुट्टीच्या दिवशीही झोपेतून डोळे चोळत उठत पाणी येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत बसावे लागणार आहे.
ठाणे जिल्ह्यांतील वेगवेगळ््या महापालिका क्षेत्रात वेगवेगळ््या दिवशी चोवीस तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्या दिवशी व विशेष करून दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. याखेरीज अचानक जलवाहिनी फुटली किंवा दुरुस्ती-देखभालीचे काम करावे लागले तर पाणी कपातीच्या दिवसांत भर पडणार आहे. पुढील वर्षीच्या जून-जुलै महिन्यापर्यंत या कपातीचा सामना करायचा आहे. (प्रतिनिधी)
ठाणेकरांना येत्या बुधवारपासून ४५ टक्के पाणी कपातीचे संकट असल्याने त्यांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला आजच्या घडीला ४७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. पाणीकपातीमुळे ठाणे शहराला बुधवार तर कळवा, मुंब्य्राला गुरुवार व शुक्रवार दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी., जलसंपदा विभाग व स्टेम कंपनीकडील उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. तर एमआयडीसीनेदेखील दोन दिवस पाणीकपातीचे संकेत दिल्याने आता रोज १५ टक्याबरोबरच दोन दिवस पूर्णपणे शटडाऊन घेण्यात येणार असल्याने ठाणेकरांपुढे भीषण संकट उभे ठाकले आहे.
डोंबिवली-कल्याण ३० टक्के पाणीकपात
च्डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात ३० टक्के पाणीकपात लागू केलेली आहे. शनिवारपासून म्हणजे दिवाळीनंतर तात्काळ त्याची अंमलबजावणी सुरु होईल. महापालिका हद्दीत सध्या मंगळवार आणि शनिवार हे कल्याण-डोंबिवलीसह टिटवाळापर्यंत पाणीकपात केली जाते. तर बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवसांमध्ये एमआयडीसीकडून २७ गावांसह एमआयडीसी क्षेत्रात ती केली जाते. या दोन्ही ठिकाणी ३० टक्के ती केली जाते.
च्कल्याण पूर्वेत सरासरी प्रतीदिन ३० टक्के पाणीकपात केली जाते. ठिकाणी आनंदवाडी, अशोक नगर, हनुमान नगर, तीसगाव नाका, चक्की नाका या ठिकाणी पाणीगळती होेते. ज्यांना पाणी हवे आहे त्या सोसायट्यांना ३२० रुपये भरल्यास रितसर टँकरने पाणी दिले जाते. पेंडसेनगरातील पाण्याच्या टाकी केंद्रातून पाणी वितरीत होते.
च्महापालिका क्षेत्रात २७ गावे धरुन दिवसाला सुमारे ३५० दशलक्ष लिटर पाणी वितरीत होते. त्यांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो, ती वगळता महापालिका ३०५-१० एमएलडी पाणी वितरीत करते. आंध्रा आणि बारवी या दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा खालावलेला असून एका ठिकाणी अवघा ३५/४० टक्के तर दुसऱ्या ठिकाणी केवळ ५६टक्केच पाणीसाठा आहे.

Web Title: Diwali is over; Time for water came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.