हुंडा मागणारा नवरा नको गं बाई ! लग्न मोडून नवरीनं शिकवला धडा, नव-यासह 7 जणांविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 11:45 AM2017-12-04T11:45:27+5:302017-12-04T13:03:22+5:30

सारखपुड्यानंतर चार चाकी गाडी व हुंडा मागणारा नवरा नको गं बाई म्हणत, मुलीने लग्न मोडणे पसंत केले.

Do not ask for a dowry donor! Navarine taught the chapter after breaking the marriage, Navsa against 7 people | हुंडा मागणारा नवरा नको गं बाई ! लग्न मोडून नवरीनं शिकवला धडा, नव-यासह 7 जणांविरोधात तक्रार

हुंडा मागणारा नवरा नको गं बाई ! लग्न मोडून नवरीनं शिकवला धडा, नव-यासह 7 जणांविरोधात तक्रार

googlenewsNext

उल्हासनगर : सारखपुड्यानंतर चार चाकी गाडी व हुंडा मागणारा नवरा नको गं बाई म्हणत, मुलीने लग्न मोडणे पसंत केले. उल्हासनगरमधील ही घटना आहे. नवरा मुलासह कुटुंबाला धडा शिकविण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नव-या मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर येथे संतोषनगर परिसरात राहणा-या मुलीचे लग्न घरच्यांच्या सर्वसंमतीने पुणे येथे राहणारा विजय गुप्ता नावाच्या तरूणासोबत जुळले. 9 ऑक्टोबर 2017 रोजी मोठ्या थाटामाटात दोंघाचा साखरपुडा झाला. मात्र सारखरपुड्याच्या दुस-याच दिवसी नव-या मुलासह कुटुंबाच्या अन्य सदस्यांनी आपले रंग दारखविण्यास सुरुवात केली. चार चाकी गाडीसह 4 लाख रुपयांची मागणी नवरी मुलीच्या कुटुंबाकडे केली. जर गाडी व हुंडा देत नसला तर लग्न मोडले असे समजा, असे उत्तरे दिली.

नवरा मुलगा विजय गुप्ता व कुटुंबाच्या मागणीने, नवरा मुलीच्या कुटुंबाला धक्का बसला. साखरपुड्या पूर्वी सगुण व परीक्षा म्हणून दिलेले रोख ३ लाख, तसेच सारखपुड्यांसाठीचा खर्च, कपडे, ग्रिफ्ट, हॉल असे 90 हजार रूपयाचा केलेला खर्च पाण्यात गेला. असे त्यांना वाटून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर मुलीने हुंड्यावाला नवरा नको गं बाई म्हणत, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठले. नवरा मुलगा विजय गुप्ता यांच्यासह विंदाप्रसाद गुप्ता, विमल गुप्ता, अजय गुप्ता, संजय गुप्ता, डॉली गुप्ता, ज्योती गुप्ता असे 7 जणांविरोधात तक्रार दाखल केली.

विठ्ठलवाडी पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून 7 जणावर भादंवी कलम 420, 406,500, 504, 506, 50, 734 तसेच हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करत असून घडलेल्या प्रकाराची सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

Web Title: Do not ask for a dowry donor! Navarine taught the chapter after breaking the marriage, Navsa against 7 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.