लाच देऊ नका, घेऊ नका ; लाचेसंदर्भातील तक्रार १०६४ क्रमांकावर नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 04:16 PM2018-10-29T16:16:27+5:302018-10-29T16:23:41+5:30

ठाणे : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात ...

Do not bribe; Report on Laches complaint number 1064 | लाच देऊ नका, घेऊ नका ; लाचेसंदर्भातील तक्रार १०६४ क्रमांकावर नोंदवा

सर्वसामान्य नागरिक यांच्यात भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनजागृती

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मुलन दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभसरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनजागृतीलाचेसंदर्भातील तक्रार करण्यासाठी १०६४ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन

ठाणे : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनजागृती करायचके निश्चित केले. यासाठी जिल्ह्यात सोमवारपासून ३ नोव्हेंबरपर्यंत भ्रष्टाचार निमुर्लनासाठी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला आहे. याशिवाय अधिकारी, कर्मचाऱ्यांरी भ्रष्टाचार विरोधात कार्यालयांमध्ये शपथही घेतली. तसेच लाचेसंदर्भातील तक्रार करण्यासाठी १०६४ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.
भ्रष्टाचार निमुर्लनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहची माहिती देण्यासाठी सप्ताहाबाबत माहिती होण्यासाठी कार्यालयांमध्ये फलक लावणे. शाळा, महाविद्यालयात भ्रष्टाचाराच्या परिणामांची माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. याप्रमाणेच चित्रपट गृहे, सार्वजनिक ठिकाणे याठिकाणी या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करण्यात येईल, अशी माहिती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली. तत्पुर्वी आज सर्व शासकीय कार्यालयांत भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन सप्ताहास सुरु वात करण्यात आली. याशिवाय महत्वाचा भाग म्हणजे प्रमुख कार्यालयांत बैठका घेऊन लाचखोरीसंदर्भात, तसेच विभाग करीत असलेल्या कार्यवाहीची, कायद्यातील तरतुदींची व्यापक माहिती देण्यात येणार आहे.
या उपक्रमात अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लाचेसंदर्भातील तक्र रींसाठी १०६४ या क्र मांकावर माहिती देण्यासही सांगण्यात आले आहे. याप्रमाणेच संबंधिताना spacbthane@mahapolice.gov.in या ठाणे कार्यालयाच्या ईमेलवर देखील तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भ्रष्टाचार निमुर्लनासाठीच्या या दक्षता जनजागृती सप्ताहच्या कालावधीत जिल्ह्यातील ठाणेसह नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून या ठिकणीही विविध कार्यक्र म आयोजित केले जाणार असल्याचे सुतोवाच डॉ. पाटील यांनी केले.

Web Title: Do not bribe; Report on Laches complaint number 1064

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.