वृत्तपत्रविक्रेतीच्या स्टॉलवर कारवाई, नौपाडा प्रभाग समितीला पडला परिपत्रकाचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 04:32 AM2018-06-15T04:32:32+5:302018-06-15T04:32:32+5:30
काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने परिपत्रक काढून वर्तमानपत्रविक्रेत्यांना सुरक्षित केले असतानाही ठाण्यातील विश्रामगृहासमोर वर्तमानपत्रविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्मिता खराडे यांच्या स्टॉलवर नौपाडा प्रभाग समितीने गुरुवारी कारवाई केली.
ठाणे - काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने परिपत्रक काढून वर्तमानपत्रविक्रेत्यांना सुरक्षित केले असतानाही ठाण्यातील विश्रामगृहासमोर वर्तमानपत्रविक्र ी करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्मिता खराडे यांच्या स्टॉलवर नौपाडा प्रभाग समितीने गुरुवारी कारवाई केली.
मुंबईच्या धर्तीवर काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने परिपत्रकाद्वारे वर्तमानपत्रविक्रेत्यांना फेरीवाल्यांमधून वगळून सुरक्षित केले होते. मात्र, खराडे यांच्या स्टॉलवर कारवाई झाल्यामुळे वर्तमानपत्रविक्रेत्यांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्तमानपत्रविक्रेत्यांवर कारवाई झाल्याचे कळताच ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्रविक्रेत्या महिलेची भेट घेतली. तसेच नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वर्तमानपत्रविक्रेत्यांची बाजू मांडली. त्यानंतर, गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन खराडे यांना स्टॉल लावण्याची परवानगी दिली. यावेळी अभियानाचे अनुपकुमार प्रजापती व मिलिंद महाजन उपस्थित होते.