पुढील ४८ तास समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका: मच्छीमारांना इशारा 

By धीरज परब | Published: October 1, 2023 07:39 PM2023-10-01T19:39:15+5:302023-10-01T19:40:02+5:30

येणाऱ्या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ सृदश्य स्थिती उद्भवणार असल्याचेच संदेश प्राप्त झाले आहेत . 

do not go for sea fishing for next 48 hours warning to fishermen | पुढील ४८ तास समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका: मच्छीमारांना इशारा 

पुढील ४८ तास समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका: मच्छीमारांना इशारा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरारोड - येत्या ४८ तासात वादळ सृदश स्थिती उद्भवणार  सल्याने मीरा भाईंदर सह ठाणे व पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये व गेले असल्यास नजीकच्या बंदरात आसरा घ्यावा असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दि . हं . पाटील यांनी दिला आहे . 

पाटील यांनी रविवार १ ऑक्टोबर रोजी ठाणे - पालघर जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना जारी केलेल्या पत्रका नुसार , भारतीय तटरक्षक दल व प्रादेशिक हवामान केंद्र यांनी हवामान विषयक इशारा दिला आहे . येणाऱ्या काळात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ सृदश्य स्थिती उद्भवणार असल्याचेच संदेश प्राप्त झाले आहेत . 

त्यामुळे पुढील ४८ तास मच्छीमारांनी पूर्व मध्य अरबी समुद्र व महाराष्ट्र - गोवा किनाऱ्यालगत न जाण्याचा सल्ला दिला आहे . ज्या मच्छीमार नौका मासेमारी साठी समुद्रात गेल्या आहेत त्यांना जवळच्या बंदरात आसरा घेण्याचे सूचित करावे असे त्यांनी मच्छीमार संस्थांना कळवले आहे . सर्वानी दक्ष आणि सतर्क रहावे व परवाना अधिकारी यांच्या संपर्कात रहावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे . 

Web Title: do not go for sea fishing for next 48 hours warning to fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.