कंत्राटदारास थकीत बिल अदा करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:16 AM2020-02-20T00:16:13+5:302020-02-20T00:16:50+5:30

अनेक बसची दुरुस्तीच नाही : कर्मचारी संघटनेचा आक्षेप, १२८ बसच्या देखभालीचे तीन वर्षांसाठी दिले होते कंत्राट

Do not pay the bills to the contractor | कंत्राटदारास थकीत बिल अदा करू नका

कंत्राटदारास थकीत बिल अदा करू नका

Next

कल्याण : कोट्यवधी रुपयांचे बिल थकल्याने कंत्राटदाराने वार्षिक देखभाल दुरुस्तीचे कंत्राट (एएमसी) बंद केले असले तरी कंत्राटदाराला दिलेले उद्दिष्ट त्याने पूर्ण केलेले नाही. त्याचा परिणाम बसच्या संचालनावर झाला आहे. त्यामुळे कंत्राटदाराचे थकीत बिल अदा करू नये, असे पत्र महानगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेने परिवहनचे महाव्यवस्थापक मारुती खोडके यांना दिले आहे.

केडीएमटीच्या उपक्रमातील जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खरेदी केलेल्या १०८ बस व पूर्वीच्या टाटा मेक २० मोठ्या बस, अशा एकूण १२८ बसच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट (एएमसी) देण्यात आले होते. तीन वर्षांसाठी दिलेले हे कंत्राट १ मार्च २०१९ पासून सुरू झाले होते. १२८ बसपैकी सुस्थितीतील ९५ बसदुरुस्तीसाठी उपक्रमाकडून दिल्या गेल्या होत्या. परंतु, तीन कोटी रुपयांचे बिल केडीएमटीकडून थकल्याने कंत्राटदार काम करण्यास इच्छुक नव्हता. कंत्राटदाराकडून कंत्राट बंद करण्यासंदर्भात केडीएमटीला आगाऊ नोटीस देण्यात आली होती. त्यात देखभाल दुरुस्तीचे कंत्राट देऊनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, असा ठपका उपक्रमाने ठेवल्याने संबंधित कंत्राट डिसेंबरअखेर बंद करण्यात आले. दरम्यान, कंत्राटदाराने त्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण न केल्याने सध्या ४० ते ५० बसच रस्त्यावर धावत असल्याचा मुद्दा कामगार कर्मचारी संघटनेने उपस्थित केला आहे. कंत्राटदाराने अटीशर्तींचा भंग केल्याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.

वाहक कंत्राटावरही आक्षेप
कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या वाहकांना स्टॅण्ड बुकिंगसारखी कामगिरी देऊन कंत्राटदार बिले वाढवित असल्याचा आरोपही कामगार-कर्मचारी संघटनेने केला आहे. प्रत्यक्षात उपक्रमात असणाऱ्या कर्मचारीवर्गास पुरेल, इतकाही बसताफा नसताना कंत्राटावर वाहक नेमून उपक्रमाच्या खर्चात एकप्रकारे वाढ होत असल्याकडे संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल पंडित यांनी लक्ष वेधले आहे. याची रीतसर विभागीय चौकशी करावी, अशी मागणीही संघटनेने खोडके यांच्याकडे केली आहे.

Web Title: Do not pay the bills to the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.