डोंबिवलीसह ठाकुर्ली स्थानकात गर्दीच्या वेळेत जूने पादचारी पूल वापरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 08:07 PM2018-07-12T20:07:08+5:302018-07-12T20:09:19+5:30
डोंबिवली: अंधेरी दूर्घटनेसह एलफीस्टन स्थानकातील पादचारी पूलांच्या अपघाताची दखल घेत डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल व ठाकुर्ली स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूलाचा कमीत कमी वापर करा असे आवाहन रेल्वे पोलिस फोर्स (आरपीएफ)ने प्रवाशांना केले आहे.

यासंदर्भात डोंबिवली स्थानकातील आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आर.के.मिश्रा यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, या स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल जुना झाला असून तो अरूंद आहे. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून त्या ठिकाणी फलाट क्रमांक १,३, ४ व ५ वर एकाच वेळी अप-डाऊन दोन्ही दिशांवरील लोकल आल्यावर तोबा गर्दी होते. त्यामुळे चेंगराचेंगरीची शक्यता नाकारता येत नाही. पावसाच्याा दिवसांमध्ये प्रवासी पाण्यापासून बचावासाठी पूलांच्या प्रवेशद्वारावर गर्दी करतात, परिणामी मागुन येणा-या लोंढ्यात वाढ होते. अशा वेळी अपघात होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या कारणासाठी मधल्या रूंद, मोठ्या पादचारी पूलाचा वापर प्रवाशांनी जास्तीत जास्त करावा अशी उपाययोजना असल्याने आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी छोटया आकाराचे होर्डिंग्ज पूलांवर तसेच अन्यत्र दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. प्रवाशांनी त्याची नोंद घेत स्वत:चा जीव सुरक्षित ठेवून सहप्रवाशांमध्येही जनजागृती करावी असे ते म्हणाले. ठाकुर्लीतही मुंबई दिशेकडील पूल अरुंद असून त्यावरही फार गर्दी करु नये, जरी गर्दी झाली तरी प्रवाशांनी एकमेकांना सहकार्य करत मार्ग काढावा असेही ते म्हणाले.