उल्हासनगर महापालिकेत प्रशासकीय राजवट नको, निवडणुका घ्या!
By सदानंद नाईक | Published: November 21, 2022 04:34 PM2022-11-21T16:34:36+5:302022-11-21T16:35:13+5:30
उल्हासनगर महापालिकेत गेल्या ८ महिन्यापासून प्रधासकीय राजवट लागली असून आयुक्ती पदी आलेले अजीज शेख यांनी सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामाचा धडाका सुरू केला.
उल्हासनगर : राज्यासह जिल्ह्यातील महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने विकास कामे ठप्प पडून मनमानी सुरू झाल्याने, निवडणुका घेण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सचिव व महापालिकेचे माजी सभागृहनेते भारत गंगोत्री यांनी राज्य शासनासह जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तहसिलदार आदिना केली.
उल्हासनगर महापालिकेत गेल्या ८ महिन्यापासून प्रधासकीय राजवट लागली असून आयुक्ती पदी आलेले अजीज शेख यांनी सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामाचा धडाका सुरू केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे माजी सभागृहनेते भारत गंगोत्री यांनी मात्र लोकशाहीत मतदारांचा हक्क न डावलला जात असल्याचा आरोप केला. शहर विकासासाठी व लोकशाही जिवंत राहण्यासाठी महापालिका सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्तासह जिल्हाधिकारी, प्रांत कार्यालय, तहसीलदार आदींना निवेदनात द्वारे केली.
महापालिकेच्या कामकाजावर लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नसल्याने, प्रशासकीय राजवट लागलेल्या महापालिका कारभारात अनागोंदी कारभार सुरू झाला. यामुळे यातून मोठे घोटाळे बाहेर येणार असल्याची शक्यता गंगोत्री यांनी पत्रकार यांच्याकडे व्यक्त केली. हळूहळू राज्यातील सर्वच भागातून अशी मागणी सुरू होणार असून केंद्र व राज्य शासन यांना निवडणूक घेण्यास भाग पडणार आहे.
प्रशासकीय राजवट लोकशाहीला घातक असून सत्ताधारी जाणीवपूर्वक महापालिका सार्वत्रिक निवडणूका टाळत असल्याचा आरोपही गंगोत्री यांनी केला. महापालिकेत सर्व निर्णय आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मुख्य लेखा अधिकारी, शहर अभियंता, नगररचनाकार आदीजन घेत आहेत. महापालिका कारभारा विषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळत नसून गुपचूप सर्व कारभार हाकलला जात असल्याचा आरोप गंगोत्री यांचा आहे.
अवैध बांधकामे, पाणी टंचाई, साफसफाई, उघड्या वाहणारे कचऱ्याची वाहतूक, डम्पिंग ग्राऊंड प्रश्न, रस्त्याची दुरावस्था आदी अनेक समस्या आ वासून उभ्या टाकल्या. असेही त्यांची म्हणणे आहे. आज राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीची मागणी होते. यानंतर राज्यातून होणार असल्याचे संकेतही दिले.