‘फिट इंडिया’करिता ‘दुपट्टा वर्कआउट’ गरबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:43 AM2019-09-24T00:43:05+5:302019-09-24T00:43:12+5:30

फिटनेस गरब्याकडे कल : ‘ढगाला लागली कळं’वर खेळणार वेस्टर्न पोपट गरबा

Do a 'Scarf Workout' for 'Fit India' | ‘फिट इंडिया’करिता ‘दुपट्टा वर्कआउट’ गरबा

‘फिट इंडिया’करिता ‘दुपट्टा वर्कआउट’ गरबा

Next

- प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’संकल्पनेला पुढे नेण्याकरिता यंदा गरब्यात फिटनेसवरच भर दिला जाणारा असून पॉवर गरब्याच्या फिव्हरनंतर यंदा प्रथमच गरबाप्रेमी ‘दुपट्टा वर्कआउट’ हा आगळावेगळा गरबा खेळणार आहेत. जिममध्ये केल्या जाणाऱ्या व्यायाम प्रकाराला दुपट्टयाची जोड देऊन हा गरब्याचा नवा प्रकार यंदा नवरात्रोत्सवानिमित्त नृत्य दिग्दर्शकांनी आणला आहे. हा गरबा शिकण्यासाठी तरुणाईबरोबर गृहिणीही येत आहेत.

प्रत्येक जण फिटनेसबाबत जागरूक आहे. त्यामुळे शारीरिक व्यायाम व्हावा, यादृष्टीने अनेक नृत्य दिग्दर्शक गरबाप्रेमींना गरबा शिकवतात. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या फिव्हरनंतर आणि ‘सोनू...’च्या तडक्यानंतर गेल्या वर्षी गरबाप्रेमींनी फिटनेस देणारा पॉवर गरबा खेळला होता. यंदा पॉवर गरब्याची पुढची पायरी दुपट्ट्यासोबत वर्कआउट गरबा शिकवला जात आहे. नृत्य दिग्दर्शिका वैशाली सत्रा यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा गरबा शिकवण्यात येत आहे. ठाण्यासह इतर शहरांतूनही या गरब्याला पसंती मिळत आहे. जिममधील व्यायामाला पारंपरिक गरब्याची जोड देऊन या गरब्याच्या स्टेप्स तयार केल्या आहेत. स्कॉट्स, वेटलिफ्टिंग, स्ट्रेचिंग, लंजेस यासारखे व्यायामाचे अनेक प्रकार या गरब्यात पाहायला मिळणार आहेत. केवळ जिममधील नव्हे तर झुंबा आणि अ‍ॅरोबिक्समध्ये शिकवण्यात येणाºया व्यायामाच्या प्रकारांचीही या गरब्याला जोड देण्यात आली आहे. या गरब्यामुळे स्नायूंची क्षमता वाढते, वजन कमी होते, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवता येत असल्याचे सत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या गरब्यासाठी ट्रॅकसूट, टी-शर्ट, दुपट्टा आणि खास नवरात्रीनिमित्त येणारे जॅकेट हा पेहराव घालून हा गरबा खेळता येणार असल्याचे त्या म्हणाल्या. गरब्याचा हा प्रकार ‘ओढणी ओढू ओढू ने उडी जाए’ या गरब्याच्या गाण्यावर शिकवला जात आहे. नवरात्रीचे दिवस जवळ येत असल्याने सध्या गरब्याच्या सरावाचा जोर आहे. पोपट, दोडिओ यासारख्या पारंपरिक गरब्याबरोबर गुजरातमधील टिटडो, हिंदडो हे प्रकारही गरबाप्रेमींना शिकवले जात आहेत. साल्सा गरब्याचीही दरवर्षीप्रमाणे १० दिवस चलती आहे.

महिलांची मिळतेय सर्वाधिक पसंती
ढगाला लागली कळं’ या प्रसिद्ध मराठी गाण्यावर वेस्टर्न पोपट गरबा खेळला जाणार आहे.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, उदे गं अंबे उदे, माऊली माऊली या गाण्यांवर लेझीमसारखाच तीन तालीचा गरबा शिकवला जात आहे.
दुपट्टा वर्कआउट गरब्याकडे १८ ते ६० वयोगटांतील गरबाप्रेमी आकर्षित झाले आहेत. यात महिलावर्गाचा अधिक समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ ही संकल्पना राबवली असल्याने त्याच्यावरच भर देत आम्ही यंदा दुपट्टा वर्कआउट हा गरब्यात नवा प्रकार आणला आहे. यामुळे गरबाप्रेमींचा व्यायामही होतो आणि त्यांना गरब्याचा आनंदही लुटता येतो.
- वैशाली सत्रा, नृत्य दिग्दर्शिका

Web Title: Do a 'Scarf Workout' for 'Fit India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.