डॉक्टर दाम्पत्यास २ वर्षांची शिक्षा

By admin | Published: January 6, 2016 01:02 AM2016-01-06T01:02:21+5:302016-01-06T01:02:21+5:30

गरोदर महिला आणि तिच्या बाळाचे आॅपरेशन करण्यासाठी रु ग्णालयात कोणतीही सुखसुविधा नसून त्यांच्या जीवास धोका होऊ शकतो हे माहित असताना ही आॅपरेशन

Doctor couple 2 year old education | डॉक्टर दाम्पत्यास २ वर्षांची शिक्षा

डॉक्टर दाम्पत्यास २ वर्षांची शिक्षा

Next

कल्याण : गरोदर महिला आणि तिच्या बाळाचे आॅपरेशन करण्यासाठी रु ग्णालयात कोणतीही सुखसुविधा नसून त्यांच्या जीवास धोका होऊ शकतो हे माहित असताना ही आॅपरेशन करून हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी महिला डॉक्टर आणि तिच्या शिकवू पतीला दोन वर्षांची शिक्षा मंगळावारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस. पी. गोगरकर यांनी सुनावली. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून शंकर रामटेके यांनी काम पाहिले.
कुळगाव बदलापूर येथे राहणारा हरिदास सोनावणे (४४ )आणित्यांची पत्नी शारदा सोनावणे (३५) यांचा वांगणी येथे दवाखाना आहे.शारदा यांच्याकडे बीएएमएस ची पदवी असून पती हे डॉक्टरकी शिकत होते. नोव्हेंबर २००७ साली त्यांच्या रूग्णालय मध्ये सायली संतोष पालांडे (२७)ही गरोदर महिला पाठदुखीच्या आजारासाठी गेली होती.तेव्हा तिला रु ग्णालयामध्ये भरती केले. उपचार सुरु असताना तिच्या पोटात ही अचानक दुखू लागले.तेव्हा शारदा सोनावणे आणि त्यांचे पती हरिदास सोनावणे यांनी आपल्या रु ग्णालयात कोणतीही सुखसुविधांसह रक्त पुरवठा सुविधा नाही,हे सर्व माहिती असतानाही तिचे आॅपरेशन करण्यास सुरु वात केली.त्यांच्या याच हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने सायली आणि तिच्या पोटातल्या बाळाच्या जीवास धोका निर्माण झाला.
अखेर त्यांना पुढील उपचारासाठी प्रथम उल्हासनगरच्या सेन्ट्रल रु ग्णालयात हलवले.त्यानंतर पुढील उपचारासाठी सायन रु ग्णालयात हलवले.तेथे उपचारसुरु असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.या प्रकरणी पती संतोष पलांडे यांच्या फिर्यादीवरून कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला.
तेव्हा सोनावणे दाम्पत्यास न्यायालयाकडून अटक पूर्व जमीन मंजूर झाला होता .त्यानंतर या प्रकरणाचा खटला गेली ८वर्षांपासून सुरु च होता. याप्रकरणात सरकारी वकील रामटेके यांनी सुमारे १२ साक्षीदार तपासले. अखेर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. गोगरकर आरोपी आणि पक्षकारांचे म्हणणे ऐकूण सोनावणे दाम्पत्यास सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor couple 2 year old education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.