वैद्यकीय कचरा मोकळ्या जागेत टाकणाऱ्या डॉक्टरला १० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:14+5:302021-04-21T04:40:14+5:30
कल्याण : मोकळ्य़ा जागेत वैद्यकीय जैविक कचरा टाकल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेने डॉ. अरुण गायकवाड यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल ...
कल्याण : मोकळ्य़ा जागेत वैद्यकीय जैविक कचरा टाकल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेने डॉ. अरुण गायकवाड यांच्याकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
डॉ. गायकवाड यांच्या रुग्णालायतील जैविक वैद्यकीय कचरा कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरातील प्रल्हाद शिंदे पुलाच्या बाजूला मोकळ्या जागेत टाकण्यात आला होता. ही बाब लक्षात येताच प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी ही कारवाई केली. डॉ. गायकवाड हे विठ्ठलकृपा रुग्णालय चालवतात. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले की, कोरोना काळात वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जाऊ नये. रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात तयार होणारा कचरा महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या एजन्सीला दिला पाहिजे. उंबर्डे येथील बायो मेडिकल वेस्ट प्रकल्पात वैद्यकीय कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. यापूर्वीही वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी दंड आकारण्याची कारवाई केली आहे.
--------------