तलवाडा आरोग्य केंद्राला मिळाले डॉक्टर
By Admin | Published: June 23, 2017 05:05 AM2017-06-23T05:05:59+5:302017-06-23T05:05:59+5:30
तालुक्यातील तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा श्रमजीवीने देताच या केंद्रात डॉ़ दिलीप चंद्र यादव यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : तालुक्यातील तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा श्रमजीवीने देताच या केंद्रात डॉ़ दिलीप चंद्र यादव यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.
या केंद्रांतर्गत असलेला संपूर्ण भाग हा शंभर टक्के आदिवासी असल्याने पावसाळयात साथीचे आजार बळावत असतांत तर संर्पदंश, विंचू दंश यासारखे रुग्णही कायम असतात, असे असतांनाही येथे गेल्या एक वर्षापासून डॉक्टर नाहीत, मार्च मध्ये एका डॉक्टरची बदली झाली असल्याने ती जागाही रिक्तच आहे़ व याठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ रितेश पटेल यांची नेमणूक केली होती.
मात्र तेही येथे फिरकत नसल्याचे पार्श्वभूमीवर तालुका श्रमजीवी संघटनेच्या वतीने तलवाडाआरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्याचे वृृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल घेऊन जिल्हापातळीवरुन हालचाली होऊन गुरुवारी ते हजर झाले आहे़त तसेच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या महिनाभराच्या कामांचा तपशिल देऊन तसा खुलासा सादर केला आहे़ मात्र मेढी येथील आरोग्य उपकेंद्रांत मार्च महिन्यापासून नर्स उपलब्ध नसल्याने लसीकरण झालेले नाही़ याचा परिणाम येथील लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे़
त्यामुळे गाव-खेडयापाडयातील आदिवासींची मोठी गैरसोय होत असल्याने २२ रोजीची आंदोलन होईल अशी माहिती श्रमजीवीचे तालुका संघटक रुपेश डोले यांनी पत्रकारांना या पार्श्वभूमीवर दिली़ व असेही सांगण्यात आले की आम्ही राबवित असलेल्या योजनेत डॉ़ रितेश पटेल दाखवा आणि २ हजार मिळावा तर हे बक्षिस आज दादडे येथील कृष्णा कासट यांनी पटेल डॉक्टरांना प्रथम दाखवून पटकविले आहे़
डॉ. पटेल यांनी दिली सबबींची जंत्री
प्रत्येक सोमवार व बुधवारी मी उपस्थित असतो़ जिल्हा स्तरावर महिन्यातून एक जि़ आ़ अधिकारी, तालुका आरोंग्य अधिकारी व वैदयकिय अधिकारी यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बालमृत्यू व एन आर एच एम बैठक असते जिल्हा आरोग्य अधिकारी समिती बैठक तसेच वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आदेशित केलेल्या जिल्हास्तरीय बैठकांकरीता उपस्थित राहावे लागते़, असा खुलासा पटेल यांनी केला आहे.सन-२०१७-१७ पासून विक्रमगड तालुका (जास्त बालमृत्यू दर असलेला तालुका) घोषित करण्यात आलेला आहे़ या विषयी तालुक्यातील प्रा़ आरोग्य केंद्र, जोखीमीची उपकेंद्रे, जोखीमीची गावे, येथे जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय, राज्यस्तरीय, नोडल अधिकारी यांच्या सोबत कामकाजाचे निरिक्षण सनियत्रण व मुल्यमापन करण्याकरीता कार्यक्षेत्रात त्यांच्या सोबत उपस्थित राहावे लागते. किंवा स्वत: कार्यक्षेत्रात भेटी द्याव्या लागतात़तालुकास्तरावर पंचायत समिती मासिक आढावा व तालुक्यातील कर्मचारी व डॉक्टर यांच्या आढावा सभेस उपस्थित राहावे लागते़ प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे आठवडयाच्या दर शुक्रवार व शनिवार ठरलेल्या दिवशी मी उपस्थित असतो़ परंतु या दिवशी तालुका अथवा जिल्हास्तरावर सभा असल्यास किंवा कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी यांचे कामाकरीता कुठलीही भेट असल्यास तिथे उपस्थितीत राहावे लागते़मागील १ वर्षापासून प्रा़ आ़ केंद तलवाडा येथील वैद्यकिय अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्याभार सांभाळत असून मागील एका वर्षापासून येथील रुग्णांची डॉक्टरं नांही किंवा रुग्णवाहिका नाही किंवा आरोग्य सेवा मिळत नाही अशी कुठलीही तक्रार तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर झालेली नाही. प्रा़ आ़ केद्रांतील कुंटुंब कल्याण स्त्री़ व पुरुष शस्त्रक्रिया शंभर टक्के राबवून व इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्र यांचे नियोजन व उदिष्टय साध्य शंभर टक्के करण्यांत आले आहे़ असेही त्यांनी म्हटले आहे.