प्रशांत इंगळे यांना समाजसेवेसाठी डॉक्टरेट
By सदानंद नाईक | Published: June 1, 2023 06:08 PM2023-06-01T18:08:03+5:302023-06-01T18:09:15+5:30
डॉक्टरेटने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : मुंबई विधापीठचे माजी सिनेट असलेले प्रा. प्रशांत इंगळे यांना समाजसेवेसाठी दिल्ली येथील स्कोरेट सोशल रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी २७ मे रोजी दिल्ली येथे देण्यात आली. डॉक्टरेटने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
उल्हासनगरातील प्रा. प्रशांत इंगळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट पदी असतांना कल्याण येथे विधापीठ उपकेंद्र सुरू करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका वठविली होती. तसेच त्यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. २७ मे रोजी नवीदिल्ली येथे एनसीइआरटीचे जॉइंट डायरेक्टर यांच्या हस्ते समाजसेवेतील मानद डॉक्टरेट पदवी स्कोरेट सोशल रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्यां वतीने देण्यात आली.
निःस्वार्थ समर्पण आणि अथक परिश्रम निःसंशयपणे असंख्य लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडत आहेत. तुमची समाजसेवेची अटल बांधिलकी सर्वांना प्रेरणा देणारी आहे, इतरांना तुमच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आणि जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहन देते. तुमच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही मनापासून कौतुक करतो आणि तुमच्या भविष्यातील प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळो. असे यावेळी सांगण्यात आले. इंगळे यांना डॉक्टरेट मिळाल्या बद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.