Doctors Day: कोरोनाने चुकवली यंदाची औषधवारी; वारकऱ्यांच्या सेवेत खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:17 AM2020-07-01T05:17:52+5:302020-07-01T05:18:04+5:30

यंदा या वारीचे ३९ वे वर्ष होते. परंतु, कोरोनामुळे ही औषधवारी रद्द करावी लागली. २२ ते ३0 जून असा या वारीचा कालावधी होता.

Doctors Day: Corona misses this year's medication; Volume in the service of Warakaris | Doctors Day: कोरोनाने चुकवली यंदाची औषधवारी; वारकऱ्यांच्या सेवेत खंड

Doctors Day: कोरोनाने चुकवली यंदाची औषधवारी; वारकऱ्यांच्या सेवेत खंड

Next

ठाणे : गेली ३८ वर्षे वारकऱ्यांची अखंड सेवा करणाºया औषधवारीत या वर्षी कोरोनामुळे खंड पडला. यंदा ही वारी चुकवावी लागल्याची खंत या औषधवारीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शुक्ल यांनी व्यक्त केली. वारकºयांची वैद्यकीय सेवा केल्यानंतर आशीर्वाद देणाºया हातांची आठवण होत असल्याचे डॉ. शुक्ल यांनी सांगितले.

ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने १९८२ सालापासून पंढरीच्या वारीला जाणाºया वारकºयांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉ. शुक्ल यांच्या पुढाकाराने औषधवारी सुरू झाली. पाच जणांनी सुरू केलेल्या या औषधवारीत आलेल्या प्रत्येक वारकºयाला ते अखंड सेवा देतात. आता या औषधवारीत सेवा करण्यासाठी २५ जणांची टीम जाते.

यंदा या वारीचे ३९ वे वर्ष होते. परंतु, कोरोनामुळे ही औषधवारी रद्द करावी लागली. २२ ते ३0 जून असा या वारीचा कालावधी होता. त्यासाठी २२ फेब्रुवारीपासूनच औषधे जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि १५ मार्चपासून या औषधांचे वर्गीकरण होणार होते.
परंतु, लॉकडाऊन जाहीर झाले आणि हे काम थांबवावे लागले. दरवर्षी मंडळाच्या सभागृहात वारीच्या दोन-अडीच महिने आधी प्रत्येक रविवारी औषधांचे वर्गीकरण केले जाते. यात तरुण मंडळींचाही सहभाग असतो. यंदा या कामात खंड पडला आहे, असे डॉ. शुक्ल म्हणाले.

औषधांचे आदिवासी पाड्यांत करणार वाटप
फलटण-बरड-नातेपुते-माळशिरज-वेळापूर-वाडीपुरोळी-वाखरी, असा औषधवारीचा मार्ग असतो. तेथे मुक्कामासाठी काही महिने आधीच संपर्क करावा लागतो. या वेळी शिबिर घेण्यासाठी जागा निश्चित झाली होती, असे डॉ. शुक्ल म्हणाले. या वारीत वारकरी व ग्रामस्थांचीही सेवा केली जाते. यंदा औषधवारी चुकल्यामुळे प्रत्येक क्षणाची आठवण येत आहे. यंदा वारकºयांचे आशीर्वाद मिळणार नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढच्या वर्षी मात्र जोमाने तयारी करणार आणि जास्तीतजास्त औषधे गोळा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या औषधवारीसाठी संकलित करण्यात आलेल्या औषधांचे मंडळाच्या वतीने आदिवासी पाड्यात वाटप केले जाणार आहे.

Web Title: Doctors Day: Corona misses this year's medication; Volume in the service of Warakaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.