डॉक्टरांना वेतनकपातीचे ‘पंचिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:26 AM2018-04-03T06:26:39+5:302018-04-03T06:26:39+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दि. १ एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक पंचिंग मशीनवरील कामाच्या उपस्थितीचा कालावधी तपासून वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांनी कामावर येताना पंचिंग केले आहे.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी दि. १ एप्रिलपासून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक पंचिंग मशीनवरील कामाच्या उपस्थितीचा कालावधी तपासून वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील बहुतांश डॉक्टरांनी कामावर येताना पंचिंग केले आहे. मात्र, कामावरून जाताना पंचिंग केले नसल्याने त्यांच्यावर वेतनकपातीची टांगती तलवार आहे.
यापूर्वी पालिका प्रशासनाने सर्व कार्यालयांत बायोमेट्रीक पंचिंग मशीनद्वारे हजेरी लावण्याची सोय सर्व अधिकारी व कर्मचाºयांना उपलब्ध करून दिली. मात्र, माजी आयुक्त अच्युत हांगे यांनी वरिष्ठ अधिकारी, अभियंते व डॉक्टर्स यांना पंचिंगमधून वगळण्याची सूट दिली होती. या सवलतीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने विद्यमान आयुक्त बळीराम पवार यांनी ही सूट रद्द करून सरसकट सर्व अधिकारी व कर्मचाºयांना १ एप्रिलपासून बायोमेट्रीक पंचिंग मशीनद्वारे कामावर उपस्थित असल्याचा कालावधी तपासून वेतन देण्याचा निर्णय लागू केला. विशेष म्हणजे पवार यांनी स्वत:पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे मिळालेल्या सवलतीचा गैरवापर करणारे वरिष्ठ अधिकारी, अभियंते व डॉक्टर यांची पंचाईत झाली आहे. या पंचिंगसाठी ज्या कर्मचाºयांनी अद्याप आधारकार्डचा तपशील संगणक विभागाकडे दिला नव्हता, अशा कर्मचारी व अधिकाºयांची सोमवारी आधार क्रमांक लिंक करण्यासाठी धावपळ उडाली.
जोशी रुग्णालयातील डॉक्टरांनी केवळ कामावर हजर होताना पंचिंग केले असून कामाची वेळ संपल्यानंतर पंचिंग करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने त्यांच्या वेतनावरही गदा आली आहे. यामुळे कर्मचाºयांचे महिनाअखेरीस दिले जाणारे वेतन अद्याप आस्थापना विभागाकडून खात्यात जमा झालेले नाही. लेटलतीफ कर्मचाºयांच्या तीन लेटमार्कनंतर त्यांच्या एका किरकोळ रजेवर संक्रांत येणार आहे.
वेतन अद्याप
जमा झालेले नाही
जोशी रुग्णालयातील डॉक्टरांनी केवळ कामावर हजर होताना पंचिंग केले असून कामाची वेळ संपल्यानंतर पंचिंग करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने त्यांच्या वेतनावरही गदा आली आहे. यामुळे कर्मचाºयांचे महिनाअखेरीस दिले जाणारे वेतन अद्याप आस्थापना विभागाकडून खात्यात जमा झालेले नाही.