जे डॉक्टरांना कळतं, ते आयएएस अधिका-यांना काय कळणार? - श्रीकांत शिंदे यांचा सरकारला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 07:27 PM2018-01-09T19:27:31+5:302018-01-09T19:29:15+5:30
सरकार आणू पाहत असलेल्या नवीन एनएमसी विधेयकात मोठ्या प्रमाणात त्रुटी असून, त्या दूर करणे गरजेचे असल्याचे मत कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
डोंबिवली - सरकार आणू पाहत असलेल्या नवीन एनएमसी विधेयकात मोठ्या प्रमाणात त्रुटी असून, त्या दूर करणे गरजेचे असल्याचे मत कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
या नव्या विधेयकाविरोधात नुकताच डॉक्टरांनी देशव्यापी संप केला होता. त्यानंतर डोंबिवलीत इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने मंगळवारी या विधेयकाला विरोध करण्यासाठी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला पेशाने डॉक्टर असलेले शिवसेनेचे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील हजार होते. त्यांनी यावेळी या विधेयकात त्रुटी असल्याचे सांगत सरकारला घरचा आहेर दिला. तसेच हे विधेयक डॉक्टरांसंबंधी असल्याने डॉक्टरांना त्याबाबत जास्त कळते, ज्या आयएएस अधिका-यांनी ते तयार केलेय, त्यांना यातले काय कळणार? असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या मेळाव्यात ठाणे जिल्ह्यातील आयएमए चे सर्व डॉक्टर उपस्थित होते.