निविदा घंटागाडीची मात्र कागदोपत्री डम्पर व डीलिव्हरी व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:55 AM2021-02-20T05:55:09+5:302021-02-20T05:55:09+5:30

ठाणे : कळवा-मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात घोळ झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने घंटागाड्यांऐवजी कागदोपत्री डम्पर व डीलिव्हरी ...

Document dumper and delivery van of the tender bell train | निविदा घंटागाडीची मात्र कागदोपत्री डम्पर व डीलिव्हरी व्हॅन

निविदा घंटागाडीची मात्र कागदोपत्री डम्पर व डीलिव्हरी व्हॅन

Next

ठाणे : कळवा-मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात घोळ झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने घंटागाड्यांऐवजी कागदोपत्री डम्पर व डीलिव्हरी व्हॅनची नोंद केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्याकडे भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी गुरुवारी महासभेचे लक्ष वेधले. अखेर यासंदर्भात चर्चेसाठी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात लवकरच बैठक आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

महापालिकेच्या वेबिनार महासभेत अखेर गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास झाला. कळवा-मुंब्रा प्रभाग समितीत घनकचरा व्यवस्थापनाचे २०१७ ते २०२२ पर्यंतच्या कंत्राटाबाबत पवार यांनी सविस्तर माहिती मागविली होती. त्यानुसार महापालिकेने दिलेल्या कागदपत्रांमध्ये टाटा एसीई व ७०८ एसीई वाहने असलेल्या घंटागाड्यांऐवजी काही गाड्या चक्क डम्पर (टीपर) व डीलिव्हरी व्हॅन असल्याचे आरटीओतील कागदपत्रांत आढळले. त्याचबरोबर पवार यांनी बँक सॉल्व्हन्सिमध्ये आढळलेल्या तफावतीचा मुद्दाही मांडला. संबंधित कंत्राटदाराचे काम नांदेड-वाघाळा महापालिकेत २००६ ला सुरू झाले होते. मात्र, अनुभव प्रमाणपत्रात २००५ चा उल्लेख होता. त्याचबरोबर कचरा उचलण्याचे काम कोणत्या वाहनाद्वारे केले गेले, याबाबत माहिती नव्हती. निविदा रकमेच्या ५० टक्के इन्कम टॅक्स टर्नओव्हरची अट होती. मात्र, मिळालेल्या कागदपत्रांत संबंधित कंत्राटदाराचा टर्नओव्हर केवळ सात ते आठ लाखांचा आहे. या मुद्द्यांकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

अखेर या प्रश्नावर आपल्या दालनात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी घोषणा महापौर नरेश म्हस्के यांनी केली. बैठकीत या मुद्द्यांबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केले.

Web Title: Document dumper and delivery van of the tender bell train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.