लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणे यांनी अत्रे कट्ट्यावर व्यक्त केली अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 04:14 PM2018-12-27T16:14:16+5:302018-12-27T16:15:33+5:30

अत्रे कट्ट्यावर लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक सदानंद राणे यांनी लोककला आणि लोकनृत्याची माहिती प्रेक्षकांना दिली.

The documentary of the Lokkale should be done: Sadanand Rane expects to express the perfume | लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणे यांनी अत्रे कट्ट्यावर व्यक्त केली अपेक्षा

लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणे यांनी अत्रे कट्ट्यावर व्यक्त केली अपेक्षा

Next
ठळक मुद्देलोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे : सदानंद राणेराणे यांनी प्रेक्षकांना दिली लोककला आणि लोकनृत्याची माहिती अत्रे कट्ट्यावर ‘लोकगंगा आपुल्या दारी’ या विषयावर व्याख्यान

ठाणे: शासनाचे लोककलेच्या कलाकारांकडे लक्ष नाही. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटली तरी या कलाकारांच्या उपजिवीकेचे साधन कमी होत चाललेले आहे. म्हणूनच लोककला अस्त होत आहे. लोककलेला व्यासपीठ मिळत नाही अशी खंत व्यक्त करीत लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक सदानंद राणे यांनी लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर ‘लोकगंगा आपुल्या दारी’ या विषयावर राणे यांचे व्याख्यान ध्वनी चित्रिफतीसह आयोजित केले होते. यावेळी ते म्हणाले की, भारत हा देश सर्वगुण संपन्न देश आहे. समृद्ध, संस्कृती, लोककला, लोकनृत्य, परंपरा या सर्व गोष्टी आपल्या देशात आहेत. लोककलेचे डॉक्युमेंटेशन व्हावे असे शासनाला सांगितले आहे. किमान महाराष्ट्रातील लोककला, लोकनृत्याचे डॉक्युमेंटेशन करावे, जेणेकरुन याची माहिती तरुण पिढीला होईल. परदेशातील लोक आपल्या देशात येऊन आपली लोकलला शिकून त्यांच्या देशात शिकवत आहेत. परदेशातील लोकांना भारतीय लोककलेचे प्रचंड आकर्षण आहे, ते याचा अभ्यास करतात, आपली लोक मात्र याबाबत उदासीन आहेत अशी नाराजी राणे यांनी बोलून दाखविली. लोककला, लोकनृत्य हे दोन वेगळे भाग आहेत. परंपरेनुसार लोकनृत्य हे पहिले आहे. पाच हजार वर्षांपासून लोकनृत्य परंपरा आहे. आदीवासी समाजाने ही परंपरा उचलली. त्यांच्या कामातून, श्रमातून निरनिराळ््या गोष्टी येऊ लागल्या, अवजारातून गाणी निर्माण केली. प्रत्येक जमात त्यांचा जो पारंपारिक व्यवसाय करत आले, त्या व्यवसायातील अ‍ॅक्शन नृत्यात येत गेल्या. प्रत्येक जिल्ह्यात लोकनृत्याचा फरक आहे. लोककला जोपासणे कठिण आहे. कला चालली पाहिजे, घरही चालले पाहिजे याचा मेळ घालणे कठिण आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी ध्वनी चित्रिफतीच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील लोकनृत्य दाखवून त्याची त्यांनी माहिती दिली. यात बोहाडा, पश्चिम महाराष्ट्राचे डहाका, भारुड, नागपूरमधील खडी गंमत, कोकणातील नमन, आदीवासींचे उरण तालुक्यातील डेंगा नृत्य, सांगली जिल्ह्यातील धनगर नृत्य, गोव्याचे तिक्री नृत्य, गुजरातमधील राठवा नृत्य, महाराष्ट्र - गुजरातच्या सिमेवर केले जाणारे डांगी नृत्य, राजस्थानचे तेरह ताली अशा विविध लोकनृत्यांची त्यांनी प्रेक्षकांना मनोरंजक माहिती दिली.
 

Web Title: The documentary of the Lokkale should be done: Sadanand Rane expects to express the perfume

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.