जव्हारमध्ये पाणलोटची कामे कागदोपत्रीच
By admin | Published: November 14, 2015 11:31 PM2015-11-14T23:31:31+5:302015-11-14T23:31:31+5:30
रोजगारा अभावी आदिवासींची वणवण थांबावी तसेच त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा या उद्देशाने शासन कृषी विभागाच्या अंतर्गत आणि पाणलोटच्या माध्यमातून कोट्यावधीची कामे केली जातात.
मोखाडा : रोजगारा अभावी आदिवासींची वणवण थांबावी तसेच त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा या उद्देशाने शासन कृषी विभागाच्या अंतर्गत आणि पाणलोटच्या माध्यमातून कोट्यावधीची कामे केली जातात. परंतु ही कामे केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात काहीच हालचाल दिसत नाही. यामुळे आदिवासींचा विकास खुंटला आहे.
पाणलोटच्या माध्यमातून जव्हार मधील गावपाड्यात २०१३-१४ ते २०१५-१६ च्या दरम्यान कामे करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात कामे झालीच नसल्याने आदिवासींमध्ये संताप आहे. २०१३-१४ मध्ये पिंपळशेत येथे मजगी योजना एकुण सहा गटामध्ये व क्षेत्र १६, ४५ कामे करण्यात आली आहेत व यासाठी १५,२,३३२ रू खर्च झाला आहे . तर ल्युज बोल्डर योजने अंतर्गत गट क्रमांक ३ ते ५ दरम्यान करण्यात आली आहेत व यासाठी ६,३९,३०९ रू खर्च झाला आहे वाळवंडा येथे मजगी योजना एकूण चार गटामध्ये व श्रेत्र ७ व एकूण खर्च ३,७४,९४४ रू झाला आहे ल्युज बोल्डर योजना १ ते ९ गटामध्ये क्षेत्र ३५८ मध्ये कामे करण्यात आली आहेत व यासाठी २३,९४,०५६ खर्च झाला आहे.
मेढा येथे मजगी योजना एकूण २७ गटामध्ये क्षेत्र ५५,४८ व यासाठी २७,०५,७८२ रुपये खर्च झाला आहे ल्युज बोल्डर योजना १ ते १० गटामध्ये क्षेत्र ४१७ व यासाठी २८,०२,२१८ रु खर्च झाला आहे. किरमिरा येथे मजगी योजना एकूण २७ गटामध्ये व श्रेत्र ५६,६१ व २९,८१,२९६ खर्च झाला आहे ल्युज बोल्डर योजना १ ते १७ गटामध्ये क्षेत्र ३४४ व २२,१९,१५० रु खर्च झाला आहे. तलासरी ल्युज बोल्डर योजना १ ते १७ क्षेत्र १३६ मध्ये करण्यात आले आहेत ८,६४,८५० खर्च झाला आहे. चांभारशेत येथे मजगी योजना गट क्रमांक १ ते १६ क्षेत्र २७,५५ व १४,२०,९७६ रू खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना क्षेत्र ८२ मध्ये ५८,७,३९२ रु खर्च झाला आहे. आकरे, हाडे, मजगी योजना गट क्रमांक १ ते १८ क्षेत्र ३२ ,२५ असुन यासाठी १७,०९,७४५ रु खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ ते १४ गटात क्षेत्र ५४१ असून ३२,०११,२५५ रु खर्च झाला आहे तसेच बोपदरी येथे सर्वात जास्त कामे केली असल्याचे दाखविले आहे.
कारण हे गाव गुजरात बॉन्डरी लगत असल्याने जव्हार पासून खुपच अंतर आह.े येथे मजगी योजना गट क्रमांक १ ते १२ क्षेत्र ३४,७२ व यासाठी १७,२८,१३६ रु खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ ते ६ क्षेत्र २,७० मध्ये करण्यात आले असून १६३१८६४ खर्च झाला आह.े परंतु हे कामे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली नसल्याचे येथील सरपंच विनायक जाबर यांनी सांगितले २०१३-१४ मध्ये पाणलोट साठी २ कोटी२९ लाख १२ हजार ४१ रुपये खर्च झाला आहे तसेच १४-१५ च्या दरम्यान न्याहाळे येथे मजगी योजना एकूण दहा गटामध्ये क्षेत्र १६३२ मध्ये कामे करण्यात आली आहेत ३ लाख ३२ हजार रुपये खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ते ६ दरम्यान करण्यात आली आहेत व यासाठी ४ लाख ९८ हजार पाचशे रुपये खर्च झाला आहे कवलाळा येथे मजगी योजना एकुण नऊ गटामध्ये क्षेत्र १५,१२ मध्ये कामे करण्यात आली आहेत व यासाठी २ लाख ९८ हजार रुपये खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ ते ६ गटामध्ये कामे केली आहेत ४ लाख ५५ हजार रुपये खर्च आहे. झाप येथे मजगी योजना एकूण पाच गटामध्ये क्षेत्र १२,१४ मध्ये कामे केली आहेत यासाठी ३ लाख १२ हजार खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ ते ८ गटामध्ये कामे करण्यात आली असून ५ लाख १३ हजार खर्च आहे . बोपदरी येथे मजगी योजना एकुण आठ गटामध्ये १७ लाख २८ हजार ५५२ रुपये खर्च झाला आहे तर ल्युज बोल्डर योजना १ते१५ गटामध्ये क्षेत्र ३५,१२ एकुण खर्च १८ लाख ३५ हजार १५२ खर्च झाला असून २०१४-२०१५ च्या दरम्यान ५७ लाख ७१ हजार ७०४ रुपये खर्च झाला आहे तसेच या कामांची माहिती दिली जात नाही कारण ती प्रत्यक्षात न करता कागदोपत्रीच केली आहेत. ग्रामपंचायतींना भेट दिली असता ती झाली नसल्याचे आदीवासींनी सांगितल्याने चौकशी झाली पाहिजे.