डोंबिवलीत भरला श्वानांचा रॅम्पवॉक, डोंबिवलीकरांचा भरभरून प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 03:38 PM2017-11-27T15:38:04+5:302017-11-27T16:19:56+5:30

विविध जातीच्या, रंगाच्या, आकाराच्या श्वानांनी संगीताच्या तालावर, रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून रॅम्पवॉक केला.

dog fashion show in dombivali | डोंबिवलीत भरला श्वानांचा रॅम्पवॉक, डोंबिवलीकरांचा भरभरून प्रतिसाद

डोंबिवलीत भरला श्वानांचा रॅम्पवॉक, डोंबिवलीकरांचा भरभरून प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देविविध जातीच्या, रंगाच्या, आकाराच्या श्वानांनी संगीताच्या तालावर, रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून रॅम्पवॉक केला. रंगीबेरंगी कपडे घालून रॅम्पवर उतरलेल्या या श्वानाचं रॅम्पवॉक सगळ्यांसाठीच लक्षवेधी ठरलं.

डोंबिवली- विविध जातीच्या, रंगाच्या, आकाराच्या श्वानांनी संगीताच्या तालावर, रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून रॅम्पवॉक केला. रंगीबेरंगी कपडे घालून रॅम्पवर उतरलेल्या या श्वानाचं रॅम्पवॉक सगळ्यांसाठीच लक्षवेधी ठरलं. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊन यांच्यातर्फे या फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. स.वा.जोशी स्कूलच्या पटांगणात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी डोंबिवली, कल्याण, पुणे, रायगड, ठाणो, नेरळ, कजर्त, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणाहून श्वान सहभागी झाले होते. यामध्ये 22 जातीच्या 200 हून अधिक श्वानांचा सहभाग होता. 

बर्फाळ प्रदेशातील सायबेरीन हास्की, सेंट बर्नाड, माऊंटन डॉग, उंदराइतका लहान दिसणारा चुहाहुआ आणि पॉकेट पॉम डॉग, पोलीस डॉग, लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड, जाँईट ब्रिड, गेट्र डेन, न्युओपोलिन मासचिफ, सिक्युरिटी डॉग, डॉबरमॅन आणि रॉटवायलर या जातीच्या श्वानांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. श्वानांचा फॅशन शो मधील विविध अदा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला तीन हजार नागरिकांनी उपस्थिती लावली होती. प्राण्यांविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रकल्पप्रमुख अमर बनसोडे यांनी सांगितले. 

श्वानांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. यासाठी 200 हून अधिक डॉक्टरांचे पथक नेमण्यात आलं होतं. ठाणे शहर डॉगस्कॉड पथक, गुन्हे अन्वेषण यांची उपस्थिती यावेळी होती. या उपक्रमातून जमा झालेला निधी विविध सामाजिक उपक्रमाला वापरला जाणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष अविनाश बेनके यांनी सांगितले. 271 श्वानांपैकी 75 श्वानांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आल्याचं आयोजक सुधीर यमगर यांनी सांगितले.

किताबाचे मानकरी
या स्पर्धेत किंग ऑफ शो निळजे चा रेम्बो (गेट्र डेन) तर क्वीन ऑफ शो डोंबिवलीची फ्लुफी (लॅब्राडॉर) यांनी किताब पटकाविला आहे.

आणखी पाहा- Video: ब्रेकिंग न्यूज देताना अॅंकरसोबत झाली चक्क कुत्र्याची एन्ट्री    

Web Title: dog fashion show in dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.