ठाण्यातील पडवळनगरमध्ये टेम्पोच्या धडकेत श्वानाचा मृत्यु: चालकाला अटक

By जितेंद्र कालेकर | Published: February 25, 2018 08:05 AM2018-02-25T08:05:10+5:302018-02-25T08:05:10+5:30

टेम्पोच्या धडकेत एका श्वानाचा मृत्यु झाल्याने टेम्पोचालक रामसुबक विश्वकर्मा याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. श्वानाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळच्या रुग्णालयात पाठविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 Dog Shot killed in a tempo accident: driver arrested by Thane police | ठाण्यातील पडवळनगरमध्ये टेम्पोच्या धडकेत श्वानाचा मृत्यु: चालकाला अटक

चालकाला अटक

Next
ठळक मुद्देअपघातानंतर चालक झाला होता पसारमुंबईतील प्राणी कल्याण अधिका-यांनी घेतली दखलश्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जितेंद्र कालेकर
ठाणे: वागळे इस्टेट पडवळनगर भागातून जाणा-या एका टेम्पोने चिरडल्याने रस्त्यावरील भटक्या श्वानाचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पोचालक रामसुबक तिलकराम विश्वकर्मा याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पडवळनगर भागातील भंगारवाडी शिवराजनगर येथील रस्त्यावरुन विश्वकर्मा दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आपला टेम्पो घेऊन जात होता. त्याचवेळी टेम्पोच्या धडकेने रस्त्यावरील हा भटका श्वान गंभीर जखमी झाला. टेम्पोचे चाक पोटावरुन गेल्याने जखमी श्वानाचा काही वेळातच मृत्यु झाला. दरम्यान, घटनेचे प्रत्यक्षदर्शी राधेशाम यादव यांच्यासह अनेकांनी ठाण्यातील प्राणी मित्र तथा सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पवार आणि प्राणी कल्याण अधिकारी (मुंबई उच्च न्यायालय नियुक्त) बिमलेश नवानी यांना याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर नवानी (रा. चेंबूर,मुंबई ) यांनी याप्रकरणी रात्री ९ वाजताच्या दरम्यान टेम्पो चालक विश्वकर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांनी या श्वानाला तपासून तो मृत पावल्याचे घोषित केले. अपघातानंतर अंतर्गत रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यु झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच पोलीस निरीक्षक सुनिल पंधारकर, उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांच्या पथकाने विश्वकर्मा याला अटक केली. श्वानाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘‘ चालकांनी वाहन चालवितांना रस्त्यावरील मनुष्य किंवा कोणत्याही प्राण्याला इजा होईल अथवा त्याचा मृत्यु होईल इतक्या बेदरकारपणे वाहने चालवू नयेत. कोणत्याही प्राण्याचा जीव हा मनुष्य प्राण्याइतकाच मूल्यवान आहे. त्यामुळे चालकांनी कोणाचा जीव जाईल, अशा हयगयीने वाहने चालवू नये, असे कळकळीचे आवाहन आहे.’’
वैशाली पवार, सामाजिक कार्यकर्त्या, ठाणे

Web Title:  Dog Shot killed in a tempo accident: driver arrested by Thane police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.