कुत्र्याला दगड मारणाऱ्याचे पाडले दात, चौघावर गुन्हा दाखल; दुसऱ्या घटनेत कुत्र्याला दगड मारणाऱ्याला चोप

By सदानंद नाईक | Published: March 30, 2023 08:06 PM2023-03-30T20:06:30+5:302023-03-30T20:06:59+5:30

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल झाला.

Dog stoner's teeth knocked out in Ulhasnagar, case registered against four | कुत्र्याला दगड मारणाऱ्याचे पाडले दात, चौघावर गुन्हा दाखल; दुसऱ्या घटनेत कुत्र्याला दगड मारणाऱ्याला चोप

कुत्र्याला दगड मारणाऱ्याचे पाडले दात, चौघावर गुन्हा दाखल; दुसऱ्या घटनेत कुत्र्याला दगड मारणाऱ्याला चोप

googlenewsNext

उल्हासनगर : घरी जात असताना भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारल्याचा जाब विचारून चौघांनी गौरव याला जबर मारहाण केली. मारहाणीत त्याचे दोन दात पडले. तर दुसऱ्या घटनेत कुत्र्याला दगड मारल्या प्रकरणी रमनिक सिंग याला एका अज्ञात व्यक्तीने चोप दिला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ चोपडा कोर्ट परिसरात राहणारा १९ वर्षीय गौरव दिलीप जाधव हा बुधवारी दुपारी घरी जात होता. यावेळी कुत्रा भुंकल्याने, त्याने कुत्र्याला दगड फेकून मारला. यावेळी अज्ञात चौघांनी याबाबत जाब विचारून जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचे दोन दात पडले असून दोन दात पडण्याच्या स्थितीत आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल झाला.

तर दुसऱ्या घटनेत मध्यवर्ती रुग्णालय परिसरात राहणारा रमनिक हरींद्रपाल सिंग रस्त्याने जात असतांना भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगड फेकून मारला. यावेळी एकाने याचा जाब विचारून मारहाण केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Dog stoner's teeth knocked out in Ulhasnagar, case registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.