५ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा

By admin | Published: January 5, 2017 05:36 AM2017-01-05T05:36:39+5:302017-01-05T05:36:39+5:30

अंबरनाथ नगरपालिका हद्दीमधील कुत्र्यांनी वर्षभरात ५ हजार नागरिकांचा चावा घेतला आहे. त्यामुळे शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Dogs bite 5 thousand citizens | ५ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा

५ हजार नागरिकांना कुत्र्यांचा चावा

Next

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीमधील कुत्र्यांनी वर्षभरात ५ हजार नागरिकांचा चावा घेतला आहे. त्यामुळे शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे.
भटक्या कुत्र्यांवर कोणतीही कारवाई करता येत नसल्याने या कुत्र्यांवर केवळ निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात येते. डिसेंबर २०१४ पासून अंबरनाथमध्ये अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या वतीने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरु आहे. या संस्थेने गेल्या वर्षभरात साधारण १२०० पेक्षा जास्त कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. असे असले तरी शहरातील श्वानदंशाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. शहरात आजही कुत्र्यांची दहशत नागरिकांमध्ये आहे.
गेल्या वर्षभरात अंबरनाथमध्ये ४ हजार ९०० नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या श्वानदंशाचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसला आहे. मोकळ्या जागेत खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी या मुलांचा चावा घेतल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता कुत्र्यांचे निर्बिजीकरण पुन्हा करण्याची मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dogs bite 5 thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.