डोंबिवली : भंगारचोरांकडून १२ लाखांचा माल जप्त, सहा जणांना अटक : भंगार व्यावसायिकांचाही सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:46 AM2017-10-14T02:46:18+5:302017-10-14T02:46:32+5:30
एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये भंगाराची चोरी करणाºया सहा जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या १५ लाख रुपयांच्या मुद्देमालापैकी ११ लाख ९१ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये भंगाराची चोरी करणाºया सहा जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या १५ लाख रुपयांच्या मुद्देमालापैकी ११ लाख ९१ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात भंगार व्यावसायिकांचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
शहरात घरफोडीच्या घटना वाढत असताना दुसरीकडे चोरट्यांकडून येथील एमआयडीसीतील कंपन्यांना लक्ष्य केले जात होते. या कंपन्यांमध्ये होत असलेल्या चोºयांबाबत खबºयांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून १४ सप्टेंबरला इम्रान खान आणि मनोज गौतम यांना जेरबंद केले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस नाईक राजेंद्र खिलारे, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, विश्वास चव्हाण, सुरेश निकुळे आणि हरिश्चंद्र बांगारा या पथकाने केली.
आरोपींनी चौकशीत आणखी साथीदारांची नावे उघड केली. यात गुन्ह्यातील माल विकत घेणारा भंगार व्यावसायिक शंकर बोथ यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून ४ लाख ११ हजार रुपयांचा चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आला. तसेच रियाज खान आणि रामबली ऊर्फ बबलू चौहान या भंगार व्यावसायिकांनाही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. भंगारचोरीत आणि त्या चोरीच्या मालाची विक्री करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया गणेश पाटील यालाही पकडण्यात आले. मानपाडा परिसरातील सात कंपन्यांमध्ये चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे शेवाळे यांनी सांगितले.