Dombivali: महिलांची सुरक्षितता जपण्यामध्ये डोंबिवली, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे अव्वल
By अनिकेत घमंडी | Published: June 8, 2023 07:32 PM2023-06-08T19:32:58+5:302023-06-08T19:34:24+5:30
Kalyan-Dombivali: महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन विशेष उपक्रम राबवून रेल्वे प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये डोंबिवली, कल्याण लोहमार्ग पोलीस ठण्याने यंदाच्या वर्षी उल्लेखनिय कामगिरी।केली आहे.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन विशेष उपक्रम राबवून रेल्वे प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये डोंबिवली, कल्याण लोहमार्ग पोलीस ठण्याने यंदाच्या वर्षी उल्लेखनिय कामगिरी।केली।आहे, त्यामुळे या पोलीस ठाण्यांना गुरुवारी लोहमार्ग पोलीस महासंचालक डॉ प्रज्ञा सरवदे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, कल्याणचे वपोनी मुकेश ढगे यांनी तो सन्मान स्वीकारला. २०२३ या चालू वर्षी डोंबिवली लोहमार्ग हद्दीत २ कीडनॅपच्या घटनांचे गुन्हे दाखल होते त्या दोन्हींची उकल पोलिसांनी केली.
तसेच कल्याण।लोहमार्ग पोलीस हद्दीत विनयभंगाचे ५ गुन्हे।दाखल झाले होते त्या सगळ्यांची उकल।झाली।असून २पळवून नेण्याच्या घटनांचे गुन्हे।होते त्याचाही तपास लागला आहे. अशा पद्धतीने महिलांमध्ये सुरक्षित प्रवासाची हमी वाढवणे विषयानुसार विविध उपक्रम या पोलीस ठाण्यांतर्गत राबवण्यात येतात असेही ढगे, दुसाने यांनी सांगितले. विशेषकरून गर्दुल्ले, भिकारी आशा उपद्रव करणाऱ्यांपासून आळा घालण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यादृष्टीने जनप्रबोधन उपक्रम देखील पोलीस राबवत असल्याचे सांगण्यात आले.