Dombivali: भारतात 'खलिस्तान'ची निर्मिती होणे अशक्य, अनय जोगळेकर यांचं प्रतिपादन

By प्रशांत माने | Published: October 8, 2023 03:30 PM2023-10-08T15:30:12+5:302023-10-08T15:31:13+5:30

Khalistan: भारतात खलिस्तान निर्माण होणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही, असे प्रतिपादन पत्रकार, स्तंभ लेखक व राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांनी डोंबिवलीत शनिवारी केले.

Dombivali: It is impossible to create 'Khalistan' in India, says Anay Joglekar | Dombivali: भारतात 'खलिस्तान'ची निर्मिती होणे अशक्य, अनय जोगळेकर यांचं प्रतिपादन

Dombivali: भारतात 'खलिस्तान'ची निर्मिती होणे अशक्य, अनय जोगळेकर यांचं प्रतिपादन

googlenewsNext

- प्रशांत माने
डोंबिवली - भारतात खलिस्तान निर्माण होणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही, असे प्रतिपादन पत्रकार, स्तंभ लेखक व राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांनी डोंबिवलीत शनिवारी केले. डोंबिवलीच्या अभ्युदय प्रतिष्ठान संचालित नाना ढोबळे स्मृती ग्रंथालयाने टिळकनगर विद्या मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात "खलिस्तान - काल, आज आणि उद्या " या विषयावर ते बोलत होते. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्युदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद जोशी होते.

जोगळेकर पुढे म्हणाले शीख पंथ हा मुळात भक्तीमार्गासाठी श्री गुरुनानक देव यांनी स्थापन केला. नंतरच्या काळामध्ये खालसा पंथाची स्थापना मुघली अत्याचारां विरोधात लढण्यासाठी केली गेली. मात्र ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे शिखांना हिंदूंपासून वेगळे काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे  खलिस्तानवादी शिखांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाठिंबा देत आहेत. पण प्रत्यक्ष पंजाब मध्ये ९५% पेक्षा अधिक शिखांचा खलिस्तानला विरोध आहे याकडे जोगळेकर यांनी लक्ष वेधले. सध्याच्या मोदी सरकारने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत पाठवायची भूमिका घेऊन ट्रुडो यांच्या खोडसाळपणाला चोख प्रत्युत्तर दिले आहे, असेही   जोगळेकर म्हणाले.

Web Title: Dombivali: It is impossible to create 'Khalistan' in India, says Anay Joglekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.