Dombivali: टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार पंकजा वल्ली यांना जाहीर
By अनिकेत घमंडी | Published: March 15, 2023 12:16 PM2023-03-15T12:16:21+5:302023-03-15T12:17:03+5:30
Dombivali: डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारासाठी किलांबी पंकजा वल्ली (पंकजादीदी ) यांची निवड करण्यात आली आहे.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारासाठी किलांबी पंकजा वल्ली (पंकजादीदी ) यांची निवड करण्यात आली आहे. त्या गेली सुमारे तीन दशके जम्मू काश्मीर राज्यात ' अदिती सेवा प्रतिष्ठान ' च्या माध्यमातून महिला सबलीकरणाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहेत. दहशतवादी कारवायांत अनाथ झालेल्या मुलांची धैर्यशील माता अशी त्यांची ओळख आहे.
२५ मार्च रोजी सायंकाळी ६-०० वाजता टिळकनगर विद्या मंदिराच्या प्रांगणात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र व ₹ ५१,०००/- रोख हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजपर्यंत अवधूत शास्त्रीजी, कर्नल श्याम चव्हाण, दिलीप करंबेळकर, शेषराव मोरे, सच्चिदानंद शेवडे, शरद पोंक्षे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त रमेशजी पतंगे इत्यादी अनेक राष्ट्रीय विचारांच्या पुरस्कर्त्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या पंकजादीदी या पुरस्कारासाठी सर्वार्थाने सुयोग्य आहेत," असे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी सांगितले.