ऑक्टोबरमध्ये सुरू होणार डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:01+5:302021-09-21T04:46:01+5:30

डोंबिवली : ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी भागातील पोस्ट ऑफिसच्या आवारात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार ...

Dombivali Passport Service Center to start in October | ऑक्टोबरमध्ये सुरू होणार डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र

ऑक्टोबरमध्ये सुरू होणार डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र

Next

डोंबिवली : ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी भागातील पोस्ट ऑफिसच्या आवारात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिली. केंद्राच्या संचार राज्य मंत्रालयाकडून शिंदे यांना नुकतेच त्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

२०१७ पासून शिंदे पासपोर्ट सेवा केंद्रासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, आधी जागेअभावी पासपोर्ट सेवा केंद्रास विलंब झाला होता. त्यानंतर, शिंदे यांनीच पुढाकार घेत, डोंबिवली एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसची निवड करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी विलंब झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यासाठी शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनदरम्यान संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचे आश्वासित केले होते. दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, शिंदे यांनी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून, कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली. आता ही मागणी पूर्णत्वास जाऊन लवकरच या सेवेचा शुभारंभ होणार आहे.

--------------

ठाण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्रावर कामाचा मोठा ताण आहे, तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे आता डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास, ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खास करून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपशहरांना त्याचा फायदा होणार आहे.

.............

Web Title: Dombivali Passport Service Center to start in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.