Dombivali: गोव्याचे शिवसंस्कृती ढोल ताशा पथक ठरले तालसंग्राम पर्व ४ चे मानकरी

By अनिकेत घमंडी | Published: February 5, 2024 12:06 PM2024-02-05T12:06:55+5:302024-02-05T12:07:18+5:30

Dombivali News: सांस्कृतिक राजधानी अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात आरंभ प्रतिष्ठान या ढोल ताशा पथकाने भरवलेल्या तालसंग्राम पर्व ४ या स्पर्धेत गोवा राज्यातील शिवसंस्कृती ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. तर  द्वितीय मावळे प्रतिष्ठान, डोंबिवली, वसईच्या आविष्कार ढोल ताशा पथकाने तृतीय पारितोषिक पटकावले.

Dombivali: Shivsanskrit Dhol Tasha Squad of Goa became the champions of Talasangram Parva 4 | Dombivali: गोव्याचे शिवसंस्कृती ढोल ताशा पथक ठरले तालसंग्राम पर्व ४ चे मानकरी

Dombivali: गोव्याचे शिवसंस्कृती ढोल ताशा पथक ठरले तालसंग्राम पर्व ४ चे मानकरी

- अनिकेत घमंडी
डोंबिवली - सांस्कृतिक राजधानी अशी ख्याती असलेल्या डोंबिवली शहरात आरंभ प्रतिष्ठान या ढोल ताशा पथकाने भरवलेल्या तालसंग्राम पर्व ४ या स्पर्धेत गोवा राज्यातील शिवसंस्कृती ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला. तर  द्वितीय मावळे प्रतिष्ठान, डोंबिवली, वसईच्या आविष्कार ढोल ताशा पथकाने तृतीय पारितोषिक पटकावले.
अनुक्रमे प्रथम विजेत्या पथकाला दीड लाख रुपये, द्वितीय क्रमांक विजेत्या पथकाला एक।लाख आणि तृतीय विजेत्या पथकाला पन्नास हजार रुपये, अयोध्या येथील श्रीरामांची प्रतिकृती असलेली ट्रॉफी, प्रमाणपत्र आदी भेट देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची उपस्थिती यावेळी उल्लेखनीय होती. अशा स्पर्धा भरवणारे आरंभ हे पहिले पथक असून यंदा गोवा, मध्यप्रदेश आदींसह राज्यातील विविध भागातून स्पर्धक पथक या ठिकाणी सहभागी झाली होती, त्या सगळ्यांचे शहरात स्वागत, अभिनंदन करतो असे चव्हाण म्हणाले. या स्पर्धा केवळ राज्यात नव्हे तर देशभर व्हाव्या आणि ही शिवकालीन, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू असलेली संस्कृती परंपरा अधिकाधिक दृढ होवो अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिल्या.

सुजित सोमण, ललित पवार, राजेंद्र घाणेकर, गणेश गुंड पाटील, स्वानंद ठाकूर आदींनी परिक्षकांची भूमिका पार पाडली. शनिवारी या स्पर्धेचा शुभारंभ येथील जिमखाना ग्राउंडवर झाला, विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. धनश्री साने, विंदा भुस्कुटे, माधव जोशी, धनंजय साने, महापालिका घनकचरा विभाग उपायुक्त अतुल पाटील  यांसह शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, स्वामी नारायण ग्रुपचे, शिवसेना युवा नेते दीपेश म्हात्रे आदींनी स्पर्धेचे उदघाटन केले.

राज्य शासनाचा कलासंस्कृती विभाग, खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आमदार राजू पाटील यांचे शांतीरत्न, माजी आमदार अप्पा शिंदे, भाऊसाहेब चौधरी फाऊंडेशन, दीपेश म्हात्रे, उद्योजक माधव सिंग, यांचे सहकार्य मिळाले. तसेच माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर, राहूल दामले, मंदा पाटील,  शशिकांत कांबळे, जिमखान्याचे अध्यक्ष दिलीप भोईर, आनंद डिचोलकर, सलील।जोशी आदींनी आवर्जुन उपस्थिती लावली.

सहभागी झालेली पथके
मावळे प्रतिष्ठान, डोंबिवली, वादन एक कला, उरण, शिवसुत्र, बदलापूर, शिवस्वरूप, भिवंडी,आविष्कार, वसई शिवरुद्र, फलटण, शिवसांस्कृती, गोवा , गर्जना, डोंबिवली विघ्नहर्ता, पुणे
 
विशेष आकर्षण : पुण्याचे मानाचे समजले जाणारे रमणबाग ढोल ताशा पथकाने खास डोंबिवलीकर नागरिकांची मागणी असल्याने त्या प्रेमासाठी येथे येऊन पंचवीस मिनिटांचे तडाखेबाज वादन करून रसिकांची मने जिंकली. ढोल ताशा।प्रेमींनी त्याला प्रचंड प्रतिसाद देत वंदे मातरम, जय श्रीराम, भारत माता की जय, छत्रपती शिवजी महाराज की जय अशा घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला.

वन्स मोअर आणि शिट्या, टाळ्या...
एक से एक दिग्गज पथकांनी येथे येऊन त्यांची कला सादर केली, त्याला रसिकांनी दाद।दिली.।शिट्या, वन्स मोअर, टाळ्या वाजवून रसिकांनी आनंद, जल्लोष व्यक्त केला. तालसंग्रामच्या नावाने चांगभल म्हणत घोषणा दिल्या.

Web Title: Dombivali: Shivsanskrit Dhol Tasha Squad of Goa became the champions of Talasangram Parva 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.