डोंबिवलीत भगतसींग- फतेह अली रोडवर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 05:29 PM2018-01-30T17:29:23+5:302018-01-30T17:34:21+5:30
डोंबिवली शहरांतर्गत रस्त्यांवर खड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने वाहनचालकांसह वाहतूक पोलिस त्रस्त आहेत. ज्या रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करुन पॅच मारले होते त्या रस्त्यांमध्ये पाण्याच्या लाइनसह केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. काम झाल्यावर खड्डे तातडीने बुजवण्यात आले असले तरीही डांबरीकरण मात्र करण्यात आलेले नाही.
डोंबिवली: शहरांतर्गत रस्त्यांवर खड्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने वाहनचालकांसह वाहतूक पोलिस त्रस्त आहेत. ज्या रस्त्यावर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण करुन पॅच मारले होते त्या रस्त्यांमध्ये पाण्याच्या लाइनसह केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. काम झाल्यावर खड्डे तातडीने बुजवण्यात आले असले तरीही डांबरीकरण मात्र करण्यात आलेले नाही. तसेच केबल जमिनीत टाकतांना नियमांचे पालन झाले आहे की नाही याबाबतचही प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
फतेह अलीरोडसह भगतसिंग रोडवर अवघ्या तीन दिवसांपूर्वी रातोरात रस्ते खणुन केबल टाकण्याचे काम झाले. त्या आधी काही दिवसांपूर्वी भगतसिंग रोडवर पाण्याची दोन ठिकाणी लाइन घेण्यात आल्या, त्यातील एका ठिकाणचा खड्डा अद्यापही पूर्णपणे भरण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांसह पादचा-यांची गैरसोय होत आहे. जेथे खड्डे खणले आहेत ते तातडीने बुजवण्याची केडीएमसीची नियमावली सांगते, पण त्यामार्गदर्शक तत्वांचे पालन मात्र न झाल्याचा त्रास वाहनचालकांसह नागरिकांना होत आहे. ज्या पद्धतीने रातोरात केबल टाकण्यात आली, तेवढ्याच तत्परतेने ते काम झाल्यावर तातडीने खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरण का झाले नाही? असा सवाल उपस्थित होते आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह रस्ते आस्थापना विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.