डोंबिवली शहर झाले विद्रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:38 PM2018-10-30T23:38:45+5:302018-10-30T23:39:13+5:30

बॅनर, फलकांचा विळखा कायम; महापालिका आयुक्तांचे आदेश धाब्यावर

Dombivli city became a squid | डोंबिवली शहर झाले विद्रूप

डोंबिवली शहर झाले विद्रूप

googlenewsNext

डोंबिवली : पुण्यात झालेल्या होर्डिंग्ज दुर्घटनेचा कोणताही बोध केडीएमसीने घेतलेला नाही. बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरवर कारवाईचे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते. परंतु, अधिकाऱ्यांकडून प्रभावीपणे कारवाई होत नसल्याने छोठ्या-मोठ्या बॅनरचा सुळसुळाट झाल्याचे डोंबिवलीत पाहावयास मिळत आहे. आता त्यात दिवाळीच्या शुभेच्छा देणाºया फलकांचीही भर पडत आहे. त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणाचे चित्र कायम आहे.

पुण्यातील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर अन्य शहरांतही धोकादायक व बेकायदा होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीतही कारवाईअभावी जागोजागी बॅनर झळकत आहेत. रेल्वेस्थानक परिसरातील पूर्व-पश्चिम भाग, महत्त्वाचे चौक, तसेच पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर आणि ठाकुर्लीतील नवीन उड्डाणपुलही या बॅनरबाजीतून सुटलेला नाही. ठाकुर्ली उड्डाणपुलावर असलेल्या दिव्यांच्या खांबांवर बॅनर लावलेले आहेत. सप्टेंबरमध्ये एका राजकीय पुढाºयाच्या झालेल्या वाढदिवसाच्या बॅनर तसेच येऊ घातलेल्या दिपावलीच्या शुभेच्छा देणारे बॅनर तेथे लागले आहेत. हॉटेल व्यावसायिकांनीही जाहिरातीसाठी या उड्डाणपुलाचा आधार घेतल्याचे दिसत आहे. या एकूणच बॅनरबाजीमुळे तेथे लावलेले दिशादर्शक फलकही झाकोळले गेले आहेत.

त्याचबरोबर अन्य ठिकाणी वाढदिवसाचे बॅनर लागले असताना गणेशोत्सव आणि दसºयाच्या शुभेच्छांचे बॅनरही काढण्यात आले नसल्याचे पाहावयास मिळत आहे. हे चित्र कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावरही आहे. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव आणि दसरा या सणासुदीत बॅनर व कमानींचा विळखा शहराला पडला होता. दिपावली सणाच्या निमित्ताने हा विळखा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

उद्घाटनांचा ‘धूमधडाका’
दिवाळीच्या निमित्ताने विविध प्रभागांमध्ये विकासकामांच्या भूमिपूजनाचे आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमाची बॅनरबाजीही करणारेही यात कमी नाहीत. अशा बॅनरबाजीमुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न बुडत आहे.
जाहिरात कंत्राटदाराकडून उद्दीष्टापेक्षाही अत्यल्प प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याची बाब माहिती अधिकारात नुकतीच उघड झाली आहे. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
परंतु, आयुक्तांनी याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यात दुसरीकडे बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश प्रभागक्षेत्र अधिकाºयांना दिले गेले असताना त्यांचे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: Dombivli city became a squid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.