भारतीय संस्कृतिचे दर्शन घडवण्यासाठी, डोंबिवलीचे नृत्य कलाकार केंद्राकडून आॅस्ट्रेलियात!
By सुरेश लोखंडे | Published: October 9, 2022 09:21 PM2022-10-09T21:21:17+5:302022-10-09T21:22:58+5:30
या शिक्षकासह त्यांच्या विद्यार्थिनींनी भारत सरकारच्या वंदे भारत नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांना १५ आॅगस्टच्या स्वातंत्र दिनी राजपथावरील संचलनात नृत्य अविस्काराची संधी मिळाली होती.
ठाणे: आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केंद्र शासनाकडून जागातील विविध देशात भारतीय संस्कृतिचे दर्शन घडवण्यात येत आहे. यासाठी नृत्य कलेत पारंगत असलेल्या देशातील कलाकरांची निवड केली जात आहे. त्यात डोंबिवली येथील भरत नाट्यम नृत्य शैलीत पारंगत असलेल्या पवित्रा अर्ट इंस्टिट्युटच्या नृत्य शिक्षकासह सात विद्यार्थिंनींची निवड झाली. ते आॅस्ट्रेलियासाठी तीन शहरांमध्ये नृत्य कला आविष्कार सादर करण्यासाठीे शुक्रवारी आॅस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत.
या शिक्षकासह त्यांच्या विद्यार्थिनींनी भारत सरकारच्या वंदे भारत नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांना १५ आॅगस्टच्या स्वातंत्र दिनी राजपथावरील संचलनात नृत्य अविस्काराची संधी मिळाली होती. त्यानंतर आता आॅस्ट्रिलयात भारताच्या संस्कृतिचे दर्शन घडवण्यासाठी ते भारताचे नेतृत्व करीत असल्याचे या पथकाचे प्रमुख नृत्य शिक्षक पवित्र भट यांनी लोकमतला सांगितले. आॅट्रिलियातील कॅनबेरा, मेलबॉर्न आणि सिडनी या तीन शहरात ६ ते १६ आॅक्टोंबर दरम्यान ते ‘भरत नाट्यम’ नृत्याचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. यावेळी ‘संपूर्ण रामायण’चे दर्शन अवघ्या ४० मिनीटात भरत नाट्यमव्दारे आॅट्रिलियान नागरिकांना घडवणार आहेत.
केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने डोंबिवलीच्या या ‘भरत नाट्यम डान्स गृप’ पथक प्रमुख पवित्र कृष्ण भट्ट यांच्या नेतृत्वाखालील आठ विद्यार्थीनींना शासनाच्या खर्चाने आॅस्ट्रेलियाला पाठवले आहे. भारतीय सांस्कृतिक परिषदेकडून ठाणे डोंबिवलीसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या विद्यार्थीनींमध्य आभा अथणीकर, जान्हवी वजरामकर, जिज्ञासा गिराडे,शालिन देशमुख, जान्हवी कदम, मनस्वी पांढरपट्टे, गरीमा चव्हाण आदी भरत नाट्यमच्या विद्यार्थीनी कलाकर आॅट्रिलियात भारताचे नेतृत्व कलेच्या माध्यमातून करीत असल्याचा अभिमान असल्याचे यातील एका विद्यार्थीनीचे पालक असलेले प्रकाश गिराडे यांनी लोकमतला सांगिते.