डोंबिवली अंधारात, वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 08:13 PM2019-07-19T20:13:22+5:302019-07-19T20:13:56+5:30
पडघा येथे काम सुरू असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल
Next
ठळक मुद्देपडघा येथे काम सुरू असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल
डोंबिवली : महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार पडघा येथील मुख्य वीजवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने डोंबिवली शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. येथील पाल सबस्टेशनवरून शहरात वीज पुरवठा करणाऱ्या 100 केव्ही लाईन ट्रीप झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.
पडघा येथे काम सुरू असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असे अभियंता बिक्कड यांनी सांगितले. दिवसभर महावितरणने शटडाऊन घेतले होते, त्यामुळे शहरात याअगोदरच वीज पुरवठा नव्हता, त्यात संध्याकाळी तासभर वीज पुरवठा सुरळीत झाला होता. पण त्यानंतर संध्याकाळी पावणे आठ वाजता शहरातील सर्वत्र बत्तीगुल झाल्याने डोंबिवली शहरात सर्वत्र अंधार पसरला होता.